Marathwada Teacher Constituency : काळेंचा अर्ज दाखल करायला अजित पवार येणार, सभाही घेणार..

Ncp : अजित पवार यासाठी उद्या, सकाळी ८ वाजताच औरंगाबादते दाखल होत आहेत.
Vikram Kale-Ajit Pawar News, Aurangabad
Vikram Kale-Ajit Pawar News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad : मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसने विक्रम काळे यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. उद्या (ता.११) विक्रम काळे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे उपस्थीत राहणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराची पहिली सभा देखील ते घेणार आहेत.

Vikram Kale-Ajit Pawar News, Aurangabad
Teachers constituency : केंद्र, राज्यातील मंत्री, खासदार, आमदारांच्या उपस्थितीत भाजपचे पाटील १२ रोजी अर्ज दाखल करणार ..

विक्रम काळे यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध झाल्यानंतर नेते काय भूमिका घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. (Ncp) राष्ट्रवादीचे वक्ता सेलचे प्रदीप सांळुके यांनी भाकरी फिरवा म्हणत, उमेदवारीवर दावा सांगितला होता. (Marathwada) परंतु त्याकडे पक्षाच्या नेत्यांनी फारसे लक्ष न देता विक्रम काळे यांनाच चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला.

१२ जानेवारी ही उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख असल्यामुळे विक्रम काळे हे एकदिवस आधीच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. स्वतः अजित पवार यासाठी उद्या, सकाळी ८ वाजताच औरंगाबादते दाखल होत आहेत. सकाळी दहा वाजता पवारांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा व विद्या परिषद निवडणुकीत उत्कर्ष पॅनलच्या विजयी उमेदवारांचा सत्कार केला जाणार आहे.

त्यानंतर विक्रम काळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पवारांच्या हस्ते होईल. दुपारी साडेबारा वाजता विक्रम काळे हे विभागीय आयुक्त कार्यालयात पवारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गोदावरी पब्लिक स्कूल येथील मैदानावरच अजित पवारांची पहिली प्रचार सभा होणार आहे. यासाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली असून या निमित्ताने मोठे शक्तीप्रदर्शन देखील केले जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com