Mp Imtiaz Jalil-Raj Thackeray
Mp Imtiaz Jalil-Raj Thackeray Sarkarnama
मराठवाडा

AIMIM : राज ठाकरेंच्या सभेवर एमआयएमच्या `हाताची घडी तोंडावर बोट`चे रहस्य काय ?

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या शिवाजी पार्क येथील सभेत मशिदीवरील भोंग्याचा विषय काढला आणि राज्यातील वातावरण तापले. रमजानचा महिना सुरू असतांनाच या वादग्रस्त विषयाला हात घालत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडी सरकारची कोंडी केली. यावर सर्व राजकीय पक्षांकडून तिखट प्रतिक्रिया उमटल्या. मात्र ज्या एमआयएमकडून (Aimim) राज ठाकरे यांच्या या विधानावर कठोर टीका व प्रतिक्रिया अपेक्षित होती, त्या पक्षाने मात्र `हम कुछ नही बोलेंगे` ची भूमिका घेत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला.

देशातील कुठल्याही विषयावर आवर्जून प्रतिक्रिया देणारे आणि बाजू मांडणार एमआयएमचे सर्वेसर्वा बॅरिस्ट असदुद्दीन ओवेसी यांनीच राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया देऊ नका, अशा सूचना पक्षाच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या. (Imtiaz Jalil) नेमक राज ठाकरे यांच्या वादग्रस्त आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिकतेशी संबंधित असलेल्या विधानावर एमआयएमच्या `हाताची घडी तोंडावर बोट` भूमिकेचे नेमके रहस्य काय ? याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे.

१ मे रोजी औरंगाबादेत राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच मैदान त्यासाठी आरक्षित करण्यात आल आहे. तर पोलिसांच्या परवानगीसाठी मनसेचे नेते प्रयत्न करत आहेत. शहरातील अनेक संघटनांनी या सभेला विरोध दर्शवत पोलिस आयुक्तांना निवदेन दिली आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्याचा खासदार असलेल्या एमआयएम पक्षाने मात्र अद्याप यावर चक्कार शब्द देखील काढलेला नाही. खासदार इम्तियाज जलील यांनी गुडीपाडव्याच्या सभेनंतर सध्या आम्ही काहीच बोलणार नाही, योग्यवेळी उत्तर देऊ असे सांगत या विषयावर बोलणे टाळले होते.

पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचाच तसा आदेश असल्याचे त्यांनी सांगितले होते. मशिदीवरील भोंग्यासारखा संवेदनशील विषय असतांना एमआयएम सारख्या जहाल पक्षाने घेतलेली नरमाईची भूमिका निश्चितच संशयास्पद आहे. रमजानचा महिना असल्यामुळे कदाचित एमआयएमने ही भूमिका घेतली असावी, असे वाटत होते. परंतु आता तर थेट राज ठाकरे यांनी औरंगाबादेत येऊनच मशिदीवरील भोंगे हटवले नाही, तर मशिदीसमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला आहे.

हिजाब, सीसीए, एनआरसी, मुस्लिम आरक्षण यासह अल्पसंख्याकांच्या अनेक प्रश्नांवर आक्रमक होत सत्ताधाऱ्यांवर तूटून पडणारे खासदार इम्तियाज जलील मशिदीवरील भोंग्यांच्या विषयावर शांत कसे? हा प्रश्न अनेकांना सतावतो आहे. मतदारसंघातील राजकीय वातावरण तापलेले असतांना खासदार इम्तियाज जलील हे देशाबाहेर आहेत. त्या्मुळे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते देखील वेट अॅन्ड वाॅचच्या भूमिकेत आहेत.

भाजपची बी टीम म्हणून एमआयएमवर टीका केली जाते. हा डाग कायमचा धुवून टाकण्यासाठी गेल्या महिन्यात इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला आम्हाला सोबत घ्या, अशी आॅफर देत खळबळ उडवून दिली होती. परंतु मनसेच्या हिंदुत्व आणि भोंग्यांच्या विषयाला भाजपने पाठिंबा दर्शवत विरोध न करता मदतीची भूमिका घेतली आहे. एमआयएमने देखील यावर काहीच बोलायचे नाही असे ठरवले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा एमआयएम भाजपची बी टीम आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT