‘तात्या विंचू’ चा राजसाहेब, लवकरच ओम फट स्वाहा करणार ;मनसेचा मुंडेंना इशारा

राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे, लवकरच तुमचा थरथराट होणार.
Raj Thackeray News, Dhananjay Munde News, MNS on Dhananjay Munde News, Amey Khopkar News
Raj Thackeray News, Dhananjay Munde News, MNS on Dhananjay Munde News, Amey Khopkar Newssarkarnama
Published on
Updated on

मुंबई :इस्लामपुरच्या सभेत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde)यांनी मनसेचे (mns)अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंना 'अर्धवटराव'असे म्हणत मुंडेंनी त्यांची खिल्ली उडवली आहे. त्याला मनसेचे नेते,महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर( Amey Khopkar) यांनी मुंडेंना प्रत्युत्तर दिलं आहे. (MNS on Dhananjay Munde News)

''अहो, धनंजय मुंडेराव,तुम्ही ज्यांची ‘अर्धवटराव’म्हणून खिल्ली उडवताय,ते राजसाहेब तुमच्यासारख्या ‘तात्या विंचू’चा ओम फट स्वाहा करणार आहेत. राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे, लवकरच तुमचा थरथराट होणार. लवकर बरे व्हा,धनंजय मुंडे,''असे टि्वट करीत मुंडेंना डिवचलं आहे. आता मुंडे यावर काय उत्तर देतात, याबाबत उत्सुकता आहे.

मुंडे यांनी राज ठाकरेंना रामदास पाध्ये (Ramdas Padhyes)यांच्या अर्धवटराव बाहुल्याची उपमा देत त्यांची खिल्ली उडवली आहे. इस्लामपुर येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिवार संवाद कार्यक्रमात मुंडे बोलत होते. ठाण्यात झालेल्या राज ठाकरे यांच्या उत्तरसभेत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर टीका केली होती. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

Raj Thackeray News, Dhananjay Munde News, MNS on Dhananjay Munde News, Amey Khopkar News
याद राखा, घोडामैदान दूर नाही ; सदाभाऊ खोतांचा ठाकरे सरकारला इशारा

धनंजय मुंडे म्हणाले, ''राज ठाकरे हे भाजपचे भोंगे म्हणून काम करीत आहेत. पण पूर्वी शाळेत असताना अर्धवट नावाचे पात्र असायचे.बाहूलाच्या तोंडून बोलायचे हे पात्र. अशा बाहुलच्या तोंडून हे बोलतात.या अर्धवट रावांच्या मागे ईडीचा परिणाम असा झाला की 'लाव रे ती सीडी' म्हणणारे आता सगळे विसरून गेले आहेत. माणस सत्तेत आली की कशी माजतात हे मागच्या पाच वर्ष्यात आपण पाहिले आहे,''

Raj Thackeray News, Dhananjay Munde News, MNS on Dhananjay Munde News, Amey Khopkar News
'अर्धवटराव' म्हणत धनंजय मुंडेंनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

''तुम्हाला जात आठवते. कुणीही जातीचे राजकारण करीत नाही. आम्ही जातीयवादी राजकारण करता म्हणून सांगता, चार खासदार त्यांनी पाठवले. समतेचे राज्य पवार साहेबानी उभं केले आहे. छगन भुजबळ यांना, अमोल मिटकरी, मला अशा अनेक जणांना मोठी पदे दिली. तुम्हाला जणांची ना मनाची लाज वाटली पाहिजे,'' असा शब्दात मुंडेंना राज ठाकरेंना सुनावलं.

''पूवी रामदास पाध्ये यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ सुरु आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरु आहे. हे अर्धवटराव पूर्वी भाजपच्या विरोधात खूप बोलायचे. सीडी लावायचे, त्यांच्या मागे ईडी लागल्यानं ते आता गप्प आहेत, असा टोला मुंडेंनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com