Ajay Munde  Sarkarnama
मराठवाडा

Maharashtra Politics : बहीण-भाऊ मंत्री झाले, अन् विरोधकांच्या डोळ्यात खुपू लागले; अजय मुंडे म्हणाले, 'संपूर्ण कुटुंब धनूभाऊच्या मागे भक्कम उभं'

Ajay Munde NCP Dhananjay Munde BJP MLA Suresh Dhas Munde family Beed : राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील नेते धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडे परिवाराबाबत केलेले आरोप फेटाळले.

Pradeep Pendhare

Beed Politics : भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानंतर मुंडे कुटुंब चांगलेच आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील नेते आमदार धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत, आमदार धस यांनी केलेल्या आरोपांचे खंडण केले.

दोघे बहीण-भाऊ मंत्री झाल्याने विरोधकांच्या डोळ्यात खुपू लागले. त्यातूनच त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप सुरू झाले आहे. पण मुंडे परिवार एकत्र आहे आणि धनूभाऊच्या मागे भक्कमपणे उभा आहे, असे सांगून अजय मुंडे यांनी विरोधकांना चांगलेच ठणकावले.

अजय मुंडे म्हणाले, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राज्यात हजारो कार्यकर्ते उभे केले आहेत. पण ते आज सगळे गप्प आहेत. कारण संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही सर्व शांत आहोत. धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. यात कुटुंबाची आता बदनामी सुरू करण्यात आली आहे.

धनूभाऊ, त्यांची आई आणि बंधू यांच्याबाबत माध्यमांमध्ये भाजप (BJP) आमदार धस यांनी प्रतिक्रिया दिली की, ते एकत्र राहात नाहीत. पण, ते साफ चुकीचे आहे. धनूभाऊ यांच्या घराचे काम सुरू असून, ते आणि त्यांची आई एकत्रच राहतात, असे अजय मुंडे यांनी म्हटले आहे. परंतु बहीण-भावाला राज्यात मंत्रिपद मिळाल्याने विरोधकांकडून त्यांची बदनामी सुरू आहे, असा दावा अजय मुंडे यांनी केला.

'धनंजय मुंडे नेतृत्व तयार होताना, त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबाने 20 ते 25 वर्ष खस्ता खाल्ल्या आहेत. महाराष्ट्रात त्यांचे नाव आहे. दोघे बहीण-भाऊ मंत्री झाल्याने विरोधकांच्या डोळ्यात ते खुपू लागले आहेत. कारण धनंजय मुंडेंवर कोणताही आरोप नाही. कुठचा विषय नाही. त्यांची बदनामी सुरू आहे. राजीनामा दिला आहे, कारण त्यांची तब्येत खूपच खराब आहे. आम्ही सर्व कुटुंब त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत', असे अजय मुंडे यांनी म्हटले.

खोक्याप्रकरणात आमदार धस यांना आरोपी करावे

भाजप आमदार सुरेश धस यांच्या आरोपांवर बोलताना अजय मुंडे यांनी त्यांचा खोक्या काय काय करतो, हे सर्वांना माहिती आहे. खोक्याच्या प्रकरणात आमदार धस देखील सहआरोपी करावे. संतोष देशमुख यांच्या प्रकरणात होत असलेल्या आरोपांवर, जे काही आरोप असतील ते न्यायालयासमोर ठेवले आहेत. त्यावर निर्णय होईल. धनंजय मुंडे यांची सुद्धा तीच भूमिका आहे, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT