Satish Bhosale Khokya : फरार असलेल्या खोक्या व्हिडिओतून पहिल्यांदाच बोलला; पळून का गेला? सुरेश धसांशी नातं काय?

Satish Bhosale Khokya Interview: माझे सामाजिक कार्यक्रमातील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पाहा. माझे जे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत, ते व्हिडीओ पूर्ण व्हायरल करा. त्या शाळेत जा, मुलींची चौकशी करा”
Suresh Dhas  Satish Bhosale dhananjay munde .jpg
Suresh Dhas Satish Bhosale dhananjay munde .jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed News: एका व्यक्तीला बॅटने मारहाण करणारा, पैसे उधळणारा, आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असलेला 'खोक्या'ला पकडण्याची पोलिसांनी कंबर कसली आहे. पण तो पोलिसांच्या हाती तुर देत अद्यापही फरार आहे. पोलिसांच्या हाती न लागलेल्या 'खोक्या' उर्फे सतीश भोसले यांची मुलाखत एका मराठी वृत्तवाहिनीने घेतली आहे. यात त्याने त्यांच्यावर आरोपांबाबत खुलासे केले आहेत.

एका व्यक्तीला बॅटने मारहाण का केली याबाबत खोक्या म्हणाला, "ज्या व्यक्तीला मी मारहाण केली त्याने माझ्या मित्राच्या पत्नीची छेड काढली होती. माझ्या मित्राच्या पत्नीचे आंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली होती. त्या भगिनींने मला तो प्रकार सांगितला. हे सर्व ऐकल्यानंतर माझं डोकं संतापलं.यानंतर मी त्याला बॅटने मारहाण केली. या प्रकरणाचे सर्व पुरावे माझ्या मित्राकडे आहे. त्यांची 10 लाखांची फसवणूक झाली आहे,"

Suresh Dhas  Satish Bhosale dhananjay munde .jpg
Satish Bhosale : 'खोक्या'ला पकडण्यासाठी पोलिसांची फिल्डिंग; वाल्मिक कराडप्रमाणेच पोलिसांना शरण येणार

सुरेश धस यांच्याशी काय नातं आहे. याबाबत खोक्या म्हणाल्या, "सुरेश अण्णा धस यांचा मी छोटा कार्यकर्ता आहे. त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करावा, असे सांगितले आहे. सुरेश अण्णा हे चुकीचे काम करणाऱ्याला पाठिशी घालत नाही, मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. मी सामाजिक कार्यकर्ता आहे, अन्यायाच्या विरोधात मी आवाज उठवत असतो. मी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. मी पोलिसांना शरण जाणार आहे,"

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सतीश भोसलेचे काही व्हिडिओ दाखवत त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते आरोप त्याने खोडून काढले आहेत. “अंजलीताईंना चुकीची माहिती पुरवली जाते. त्या आधारे त्या बोलत आहेत. गुंड कशाला म्हणतात, माझे सामाजिक कार्यक्रमातील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पाहा. माझे जे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत, ते व्हिडीओ पूर्ण व्हायरल करा. त्या शाळेत जा, मुलींची चौकशी करा”, असे खोक्या भोसले म्हणाला.

खोक्यावर दोनशे हरणाची शिकार केल्याची आरोप करण्यात आला आहे. वनविभागाने त्यांच्या घरातून प्राण्याचे मांस जप्त केले आहे. त्यावर खोक्या म्हणाला, " “मी जर २०० हरणांची शिकार केली असं कोणी म्हणत असेल तर तर मग त्याने त्यावेळी तक्रार का दाखल केली नाही. २०० हरणं मारणं म्हणजे जोक नाही. तुम्ही त्याची शहानिशा करा. हे असले लोक माझ्याविरोधात मोर्चा काढतात, आंदोलन करतात, त्यात किती सत्य आहे, हे तुम्ही पाहा. त्याला फक्त स्वत:ला मोठं करायचं आहे,"

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक 'खोक्या' उर्फे सतीश भोसले हा पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती आहे. गेल्या सहा दिवसापासून तो फरार आहे. 'खोक्या'वर मारहाणीसह दोन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा विशेष पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्यांची आलिशान गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com