Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar : बीडच्या रस्त्यांसाठी बावीस कोटींचा निधी, 'दादा चा वादा' अजित पवारांनी शब्द पाळला!

Beed roads fund : अजित पवार यांनी बीड शहरातील विविध रस्त्यांसाठी 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. नगरपालिका निवडणुकीत दिलेला विकासाचा शब्द त्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवला आहे.

Jagdish Pansare

Beed News : बीड नगरपालिकेची सत्ता लोकांनी हातात दिल्यानंतर अजित पवारांनीही बीडकरांना दिलेला शब्द पाळला. शहरातील रस्त्यांसाठी बावीस कोटींचा निधी दिल्यामुळे आता बीडच्या रस्त्यांची दैना फिटणार असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी बीडचा विकास हा बारामती, पिंपरी-चिंचवडसारखा करून दाखवतो. जे पस्तीस वर्षात झाले नाही ते पाच वर्षात करून दाखवतो, दादा चा वादा आहे असा शब्द बीडकरांना दिली होता.

रस्त्यांसाठी 22 कोटींचा निधी देत अजित पवारांनी आपला 'वादा' पूर्ण करण्याच्या दिशेने पहिले पाऊलं टाकले असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्विकारल्यानंतर बीडजवळ विमानतळ, सीट्रीपलआयटी, तारांगण असे मोठे प्रकल्प हाती घेतले. नगर पालिका निवडणुकीत राजकीय परिस्थिती प्रतिकुल असतानाही बीडकरांनी अजित पवारांवर विश्वास दाखवला.

नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व गेवराईच्या आमदार विजयसिंह पंडित यांच्या हाती सोपवले. हा बदलही मतदारांनी स्वीकारला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमतासह नगरपालिकेची सत्ता दिली. आता पवारांकडूनही बीडकरांना दिलेला शब्द पाळला जात आहे. तारांगण, विज्ञानपार्क व नाट्यगृहाच्या नुतणीकरणानंतर नंतर बीडच्या रस्त्यांसाठी 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नगर पालिका निवडणुकीत अजित पवार यांनी एकदा बीड नगर पालिकेची सत्ता ताब्यात दिली तर बीडमधील विकास कामांना चालना देऊ, इथे नवनवे प्रकल्प आणून शहराचा चेहरा - मोहरा बदलू असा शब्द दिला होता. तारांगण, विज्ञान पार्कसाठी 14 कोटी रुपयांचा निधी, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह दुरुस्तीसाठी नऊ कोटींहून अधिकचा निधी यापुर्वीच मंजूर केला होता.

शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असून यात विशेषत: नगर पालिकेसमोरील रस्ता तसेच प्रमुख बाजारपेठा असलेल्या सिद्धीविनायक संकुल, छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल, बशीरगंज आदी रस्त्यांसाठी निधीची मागणी स्थानिक नेतृत्वाने अजित पवारांकडे केली होती. त्यानुसार अजित पवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून बीडमधील विविध रस्त्यांसाठी 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

या निधीतून शहरातील जालना रोड ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा, जिजामाता चौक, राजुरी वेस ते कबाड गल्ली, माळीवेस पोलीस चौकी, बार्शी रोड ते लेंडीनाला आदी विविध रस्त्यांचे सिमेंटने मजबूतीकरण व नाली बांधकामे केली जाणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT