Dhananjay Munde : हत्या प्रकरणानंतर मुंडेंची पुनरागमनाची तयारी? वर्षभरानंतरच्या भगवान गडावरील एन्ट्रीने राजकीय समीकरण बदलणार

Dhananjay Munde Meet Namdev Shashtri : धनंजय मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून मुंडेंनी भगवान गडावर जाऊन त्यांची भेट घेतली आहे.
Dhananjay Munde Meet Namdev Shashtri
Dhananjay Munde Meet Namdev Shashtrisarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. धनंजय मुंडे यांनी वर्षभरानंतर भगवान गडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली.

  2. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अडचणीत आलेल्या मुंडेंना नामदेव शास्त्री यांनी ठाम पाठिंबा दिला आहे.

  3. या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Beed Politics News : धनंजय मुंडे यांनी आज वर्षभरानंतर भगवान गडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. मस्सोजगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राजकीय दृष्ट्या अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांच्या पाठीशी नामदेव शास्त्री ठामपणे उभे राहिले होते. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात आहे, असे म्हणत शास्त्रींनी भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचे सांगीतले होते.

धनंजय मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कुठल्याही संकटात किंवा वैयक्तिक आयुष्यात चांगले, वाईट प्रसंग घडले की धनंजय मुंडे हे शास्त्रींची भेट घेऊन मार्गदर्शन, सल्ला घेत असतात. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचा राजकीय मार्ग खडतर झाला. मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्याशी असलेल्या संबंधावरून मुंडे यांना लक्ष्य करण्यात आले. परिणामी धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद, प्रतिष्ठेला धक्का पोचला.

तीच प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अशावेळी आज भगवानगडावर जाऊन संत भगवानबाबा, संत भीमसिंह महाराज यांच्या समाधीचे धनंजय मुंडे यांनी दर्शन घेतले. तसेच गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांचेही दर्शन, आशीर्वाद आणि मार्गदर्शन त्यांनी घेतले. 30 जानेवारी 2025 रोजी धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन शास्त्रींची भेट घेतली होती. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यात वाल्मीक कराडचा मुख्य आरोपी म्हणून सहभाग समोर आल्यानंतर धनंजय मुंडे हेही टीकेचे धनी ठरले.

Dhananjay Munde Meet Namdev Shashtri
Dhananjay Munde News: धनंजय मुंडेंना सर्वात मोठा दिलासा; 'या' प्रकरणी दाखल खटला पुनर्जीवित करण्यास स्थगिती

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी मुंडे यांचा संबंध जोडला गेला आणि त्यांना मंत्री पदावरून हटवावे यासाठी विरोधकांनी सरकारवर दबाव आणला. त्यानंतर काही महिन्यांनी धनंजय मुंडे यांचे मंत्रीपदही गेले. दरम्यान, नामेदव शास्त्री यांच्यासोबत भगवान गडावर झालेल्या भेटीनंतर शास्त्री यांनी महत्वाची भूमिका घेऊन ती पत्रकार परिषदेत जाहीर केली होती.

भगवान गड पाठीशी असल्याची ग्वाही...

धनंजय मुंडे गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्याने संप्रदयाचे नुकसान होत आहे. भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचे शास्त्री यांनी जाहीरपणे सांगीतले. ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली? याची मीडियाने दखल का घेतली नाही?

मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे. राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ या निमित्ताने निर्माण होत आहे. पक्षाचे नेते यांना देखील याची जाणीव की मुंडे गुन्हेगार नाही? असे म्हणत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी नामेदव शास्त्री यांची भेट घेऊन काही पुरावे, व्हिडिओ, आॅडिओ आणि एक फाईल त्यांना दिली होती. त्यानंतर शास्त्रींना आपली भूमिका बदलावी लागली होती.

बरोबर त्यानंतर एक वर्षांनी आज धनंजय मुंडे यांनी पुन्हा भगवान गडावर जाऊन नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. आज श्री क्षेत्र भगवानगड येथे ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा, संत भीमसिंह महाराज यांच्या समाधीचे मनोभावे दर्शन केले. गडाचे महंत न्यायाचार्य, ह. भ. प. डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचेही दर्शन, आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले.

गडावर शास्त्रीजीच्या मार्गदर्शनाखाली सध्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भव्य मंदिर निर्माणासह, आध्यात्मिक व शैक्षणिक संकुलाच्या उभारणीचे भव्य कार्य सुरू असून, या कामांची पाहणी करत शास्त्री महाराजांशी प्रदीर्घ चर्चा केल्याचे धनंजय मुंडे यांनी सोशल मिडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. या भेटीनंतर पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Dhananjay Munde Meet Namdev Shashtri
Dhananjay Munde: मंत्रिपदाचा राजीनामा ते प्रकृती बिघडण्यापर्यंत...! संकटांवर संकटं झेललेल्या धनुभाऊंची भावनिक पोस्ट; दिला 'हा' नवा संदेश

FAQs :

1) धनंजय मुंडे भगवान गडावर का गेले?
👉 वर्षभरानंतर त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेण्यासाठी भगवान गडावर भेट दिली.

2) नामदेव शास्त्री यांनी मुंडेंबाबत काय भूमिका घेतली?
👉 त्यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवान गड ठाम असल्याचे सांगितले.

3) संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुंडेंवर काय परिणाम झाला?
👉 या प्रकरणामुळे मुंडे राजकीय दृष्ट्या अडचणीत आले होते.

4) या भेटीचा राजकीय अर्थ काय आहे?
👉 मुंडेंच्या राजकीय पुनरागमनाचा संकेत असल्याची चर्चा सुरू आहे.

5) भगवान गडाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय प्रभाव आहे?
👉 भगवान गडाचा प्रभाव बीड आणि मराठवाड्यातील राजकारणावर मोठा असल्याचे मानले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com