Prabhani News : बारामतीनजीकच्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेला आठवड्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यानंतर आता अजितदादांच्या जुन्या आठवणी पुढे येत आहेत. परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर व अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विटेकर यांना उमेदवारी देता न आल्याने त्या बदल्यात विधानपरिषदेवर घेतले होते. तर त्यानंतर सहा महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाथरी विधानसभा मतदारसंघातून विटेकर विजयी झाले. त्यानंतर त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीपूर्वीच अजितदादांनी विटेकरांना त्यांच्या घरी जेवणासाठी येण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यापूर्वीच अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आमदार विटेकर यांच्यावर अजितदादांच्या निधनांनंतर त्यांचा अस्थिकलश आपल्या घरी नेला. यावेळी त्यांनी अजितदादांच्या विविध आठवणी या निमित्ताने सांगितल्या.
अजितदादांच्या आठवणी जागवताना विटेकर म्हणाले, दादांनी सोनपेठ येथील विविध विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. त्यांनी निधी दिल्याने या ठिकाणची अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. येथील विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन दादांच्या हस्ते व्हावे, अशी विनंती त्यांना केली होती. त्यासाठी अजितदादांनी तीन वेळा तारखा दिल्या होत्या. मात्र, ऐनवेळी काही कारणाने त्यांचे सोनपेठ येथे येणे रद्द झाले होते.
त्यानंतर एकदा अजितदादा म्हणाले, 'राजेश तुझ्या सोनपेठ येथे यायचे आहे , तुझ्या घरी यायचे आहे, तीन वेळा येणे रद्द झाले... काळजी करु नकोस, आधी सगळ्या निवडणुका व मार्चचे अधिवेशन पार पडू दे, एक पूर्ण दिवस देतो, तुझ्या सोनपेठसाठी, जेवायला सुद्धा नक्कीच घरीच येईल.'
अजितदादाने (Ajit Pawar) दिलेल्या या आश्वासनानंतर बारामती नजीकच्या विमान अपघातात त्यांचे निधन झाले. त्यामुळे या प्रसंगातून बाहेर येणे अडचणीचे ठरत आहे. त्यानंतर बुधवारी अजितदादा माझ्या घरी सुद्धा आले पण कलशात.. कसा सहन करू हा आघात, असे म्हणत आमदार राजेश विटेकर व त्यांच्या आई माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला विटेकर यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
आमदार विटेकर (Rajesh Vitekar) यांनी अजितदादांच्या निधनांनंतर त्यांचा अस्थिकलश आपल्या घरी आणला आहे. यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यासमोर अजितदादांच्या विविध आठवणी विटेकर यांनी या निमित्ताने सांगितल्या.अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी गर्दी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.