

अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे.
या चर्चांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूचक पण स्पष्ट वक्तव्य केले आहे.
आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि ज्यांना आमच्यासोबत यायचे आहे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे तटकरे म्हणाले.
Ajit Pawar Successor News: अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीकरणाची चर्चांना उत आला आहे. एकीकडे शरद पवारांच्या नेत्यांकडून अजितदादांसोबत विलिनीकरणाच्या चर्चा झाल्याचा दावा करत आहेत. तर अजितदादांच्या नेत्यांकडून तो फेटाळण्यात येत आहेत. अशातच आता शरद पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून 'चर्चेत ते (देवेंद्र फडणवीस) कुठेच नव्हते.
त्यांना विलीनीकरणाच्या चर्चेबाबत भाष्य करण्याचा अधिकार नाही' असे म्हणत त्यांच्यात आणि अजितदादांमध्ये विलीकरणाची चर्चा झाल्यावर पुन्हा एकदा बोट ठेवला आहे. मात्र दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर पुन्हा एकदा भाष्य करताना, सूचक इशारा दिला आहे. ज्यानंतर राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाल्याचे दिसत आहे.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये विलिनीकरणावरून खटके उडताना दिसत आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ही दादांची शेवटची इच्छा होती असे म्हणत विलिनीकरणासाठी आग्रह धरला जात आहे.
तर अशी कोणतीच चर्चा नव्हती असे स्पष्टीकरण देत विलिनीकरणाच्या चर्चा अजित पवार गटाकडून धुडकावण्यात आल्या आहेत. पण राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी अजितदादांनी अशा पद्धतीच्या चर्चा झाल्याची कबुली दिली आहे. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चा आणि बैठका झाल्याचे समोर आले आहे.
यादरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याआधीच दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणावर सूचक विधान करताना शरद पवारांनी दिलेल्या विलिनीकरणावरील प्रतिक्रियेवर मी बोलणार नाही. पण विलिनीकरण कोणत्या पक्षाचं?, आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवली. एनडीएचा घटक म्हणून निवडणूक लढवली. तिथं आम्ही जिंकून आलो. पण त्यावेळी कशी लढल्या हे सर्वांनाच माहित आहे. मी वारंवार पष्ट करतोय की जेव्हा निर्णय होईल त्या वेळेला सर्वांना कळेल, असे त्यांनी म्हटलं होतं.
पण आता पुन्हा एकदा त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून सूचक वक्तव्य केलं आहे. आम्ही एनडीएमध्ये आहोत, ज्यांना आमच्याबरोबर यायचे आहे त्यांनी त्यांचा विचार स्पष्ट करावा. त्यावर चर्चा केली जाईल असे म्हटले आहे. ते रायगडमध्ये बोलत होते.
यावेळी तटकरे म्हणाले की, "गेली अडीच वर्षे आम्ही एनडीएमध्ये म्हणजे भाजपसोबत आहोत. आमचा सहभाग हा एनडीएमध्ये कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. त्यामुळे आमच्यासोबत यायचं असेल तर आधी त्यांनी त्यांचा विचार स्पष्ट करावा. त्यानंतर यावर चर्चा होऊ शकेल."
1. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा का सुरू आहेत?
अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
2. सुनील तटकरे यांनी नेमकं काय वक्तव्य केलं?
आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि येऊ इच्छिणाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे ते म्हणाले.
3. राष्ट्रवादी सध्या कोणत्या आघाडीत आहे?
राष्ट्रवादी काँग्रेस सध्या एनडीए आघाडीत आहे.
4. दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची शक्यता आहे का?
सध्या फक्त चर्चा सुरू असून अधिकृत निर्णय झालेला नाही.
5. या वक्तव्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
राष्ट्रवादीच्या भविष्यातील दिशा आणि आघाडीचे राजकारण यावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.