Nanded News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाला सोडून अनेकजण महायुतीमध्ये प्रवेश करीत आहेत. नांदेड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर आता त्यांचे मेव्हुणे भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसला झटका दिला. खतगावकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत रविवारी अजित पवार यांच्या उपस्थित त्यांच्या पक्षात प्रवेश केला. दुसरीकडे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे.
रविवारी नरसी येथे पार पडलेल्या प्रवेश सोहळ्याप्रसंगी15 ते 20 हजार नागरिक उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत माजी आमदार ओमप्रकाश पोखर्णा, डॉ. मीनल खतगावकर यांच्यासह सरपंच, चेअरमन, माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी प्रवेश केला.
प्रवेश करण्यापूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत भास्करराव पाटील खतगावकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले. अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) हे माझे नातेवाईक आहेत. ते माझे मेव्हणे आहेत. वसंतराव चव्हाण यांचे भाऊ आनंदराव चव्हाण यांची मुलगी ही माझ्या घरात दिली आहे. लोकसभा पोट निवडणुकीला भाजपकडून मीनल खतगावकर यांना उमेदवारी मिळाली असती, मात्र, त्यांची मुलगी आमच्या घरात असल्यामुळे त्यांच्या मुलाच्या विरोधात उमेदवारी देणे मला संयुक्तीक वाटले नाही, त्यामुळे लोकसभेला उमेदवार दिला नसल्याचे खतगावकर यांनी स्पष्ट केले.
त्याचवेळी त्यांनी मला शिवसेना शिंदे गटाची देखील ऑफर होती. मात्र, सेक्युलर विचाराचा पक्ष म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अजितदादा हे हार्डवर्कर नेते आहेत. महाराष्ट्रातील सगळ्या प्रश्नांची त्यांना जाण आहे, असेही खतगावकर यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे खतगावकर यांनी सांगितले.
असे आहेत दोन कुटुंबातील नातेसंबंध...
दिवंगत नेते वसंतराव चव्हाण यांचे भाऊ आनंदराव चव्हाण यांची मुलगी आसावरी ही खतगावकर यांच्या घरात दिली आहे. भास्करराव पाटील खतगावकर यांचे मोठे बंधू मधुकरराव खतगावकर यांचे चिरंजीव आशिष यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला आहे. त्यामुळे चव्हाण व खतगावकर कुटुंबातील नातेसंबंध जवळचे आहेत. त्यामुळे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून रवींद्र चव्हाण यांच्याविरुद्ध मीनल खतगावकर यांना उमेदवारी मिळाली असती, मात्र पोटनिवडणुकीत त्यांच्यासमोर उभे टाकणे संयुक्तीक वाटत नसल्याने खतगावकर यांनी लोकसभेची उमेदवारी घेतली नसल्याचे समजते.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.