thackreay, shinde meeting
thackreay, shinde meeting Sarkarnama

Shinde Vs Thackeray: मोठी बातमी ! एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे पहिल्यांदाच समोरा-समोर; नार्वेकरांच्या दालनात नेमके काय घडले...

Eknath Shinde vs Aditya Thackeray News : सोमवारी मुंबईतील विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सिमेंटच्या रस्त्याबाबत सर्वपक्षीय आमदारांची बैठक झाली. त्यामध्ये प्रथमच दोघेही समोरा-समोर आले होते.
Published on

Mumbai News : शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आडवा विस्तवही जात नाहीत. त्यामुळेच माजी मंत्री आदित्य ठाकरे व एकनाथ शिंदे दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आतापर्यंतच्या दोन ते अडीच वर्षांच्या काळात एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले नाहीत. सोमवारी मुंबईतील विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सिमेंटच्या रस्त्याबाबत सर्वपक्षीय आमदारांची बैठक झाली. त्यामध्ये प्रथमच दोघेही समोरा-समोर आले होते.

विधिमंडळातील विधानसभा अध्यक्षांच्या दालनात या सर्व पक्षीय बैठकीत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही समोरा-समोर आले. मात्र, एकनाथ शिंदे दालनात येताच आदित्य ठाकरे यांनी त्यांना दुर्लक्ष केले आणि लक्ष दुसरीकडे चेहरे वळवल्याचे पाहायला मिळाले. तर एकनाथ शिंदे दालनात येताच एकनाथ शिंदे यांचे आमदार उभे राहिले मात्र उद्धव ठाकरे यांच्या आमदारांनी एकनाथ शिंदे दालनात आल्यानंतर उभे राहणे टाळले.

thackreay, shinde meeting
Shivraj Patil : काँग्रेसने भरभरून दिलेल्या चाकूरकरांची वाजपेयींनंतर आता मोदींशीही जवळीक; राजकारणापलीकडील 'मैत्री' की..?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबईच्या रस्ते कामांबाबत ही सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) ज्या खुर्चीत बसले होते. त्याच्या बाजुच्या दोन खुर्च्या सोडून आदित्य ठाकरे त्यांच्या समोर बसल्याचे पाहायला मिळाले.

thackreay, shinde meeting
Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरण तापणार? "माफी मागा, अन्यथा तोंड काळे करू, चोप देऊ", शिवसेनेची धमकी

याच सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत दृश्य सध्या व्हायरल होत आहेत. याच व्हायरल होणाऱ्या दृश्यात ज्यावेळी दालनात एकनाथ शिंदे यांचा प्रवेश झाला तेव्हा शिंदेंच्या आमदारांनी त्यांना उभे राहून नमस्कार केला पण ठाकरेंच्या आमदारांनी उभं राहणं मात्र टाळले. बैठक सुरु असताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्याकडे न पाहता दुर्लक्ष केले. तर शिंदे यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्याकडे वळून पहिले नाही. दोघेही एकमेकांकडे न पाहता समोर पहात होते, असे एकंदरीत बैठकीतील चित्र होते.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

thackreay, shinde meeting
Kunal Kamara : फडणवीसांना कमजोर करण्याचा शिंदेंचा आणखी एक प्रयत्न : आदित्य ठाकरेंनी टाकली काडी

आदित्य ठाकरेंनी केली होती तक्रार

मुंबईतील रस्त्यांच्या कामांबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी व्हावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभा अध्यक्षांकडे ही मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रस्ते कामांबाबत चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.

thackreay, shinde meeting
Shivsena UBT: पहावे ते नवलच! उद्धव ठाकरेंच्या खासदाराने गाठले भाजपचे कार्यालय; 'हे' आहे कारण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com