Ncp : शिवसेनेच्या ४० आमदारांची पळवापळवी करून सत्तेवर आलेल्या शिंदे - फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळातील चांगल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा एककलमी कार्यक्रम राबवून टेंबा वाजवला. त्यासाठी सात महिन्यात जाहिरातबाजीवर ४५ कोटी खर्च केले,अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तुम्ही पक्ष सोडल्याने कोणाचे काही अडेल असे समजू नका असा इशारा पवारांनी राष्ट्रवादी सोडून ठाकरे गटात गेलेल्या माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांना नाव न घेता दिला.
वैजापूर शहरात राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जे.के.जाधव यांच्यासह तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी (Ncp) राष्ट्रवादीत प्रवेश केला. (Ajit Pawar) रडीचा डाव खेळणाऱ्या ४० आमदारांना पोलिसांचा बंदोबस्त कशाला देत आहात. आज याच एक-एक आमदारच्या सुरक्षिततेसाठी महिन्याला प्रत्येकी २० लाखां खर्च होत आहे.
कारण भाजपला माहित आहे, हे पळाले तर सरकार कोसळणार, म्हणून त्यांचे लाड पुरवण्याचे काम सुरू असल्याचा टोला पवारांनी लगावला. एकनिष्ठ कार्यकर्त्यांची मी नेहमीच दखल घेतो व त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. पक्षासोबत गद्दारी करणारे कधीच दुसऱ्यांदा आमदार बनत नसतात हा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे.
त्यामुळे तुम्ही पक्ष सोडल्याने कोणाचे काही अडेल असे समजू नका असा इशारा पवारांनी राष्ट्रवादी सोडून ठाकरे गटात गेलेल्या माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांना नाव न घेता दिला. तर दुसरीकडे चिकटगांवकरांचे पक्ष सोडण्यास कारणीभूत ठरलेल्या आणि राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केलेल्या पंकज ठोंबरे यांचे मात्र अजित पवारांनी कौतुक केले.
तुम्ही आता तालुक्याचे नेते झाला आहात असे म्हटले. तालुक्यात बंद असलेला विनायक साखर कारखाना, बंद पडलेली रामकुष्ण जलसिंचन योजना, रोटेगाव एमआयडीसी सुरु करणे, शेतकऱ्यांना अजूनही अतिवृष्टी व विम्याचे अनुदान मिळाले नाही याकडे लक्ष वेधत हे प्रश्न सोडवण्याची मागणी देखील यावेळी अजित पवारांकडे करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.