Abdul Sattar News : नगर परिषदेच्या विरोधात भाजपने आधी डफडे वाजवले, आता बंदची हाक..

Sillod City Council : १३ फेब्रुवारी भाजपने दिलेल्या सिल्लोड शहर बंद हाकेला कसा प्रतिसाद मिळतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Bjp Protest Against Sillod City Council News, Aurangabad
Bjp Protest Against Sillod City Council News, Aurangabad
Published on
Updated on

Bjp : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची एकहाती सत्ता असलेल्या सिल्लोड नगरपरिषदेच्या (Sillod City Council) विरोधात भाजपने अधिकच आक्रमक पावित्रा घेतला आहे. भरमसाठ, बेकायदेशीर व जुलमी करवाढ प्रस्तावित केल्याच्या निषेधार्थ नुकतेच भाजपने डफडे वाजवत मोर्चा काढला होता. यावर नगराध्यक्षांनी भाजपचे आंदोलन म्हणजे राजकीय स्टंट आणि स्वतःचा कर कमी करून घेण्यासाठी केलेले स्वार्थी आंदोलन असल्याची टीका केली होती.

Bjp Protest Against Sillod City Council News, Aurangabad
Sugar Factory News : गंगापूरचा बंद कारखाना सुरू करण्याचे दोन्ही पॅनलचे आश्वासन, उद्या मतदान..

मात्र भाजपने आता थेट सिल्लोड शहर बंदची हाक दिली आहे. त्यामुळे भाजपने (Abdul Sattar) अब्दुल सत्तार व त्यांच्या ताब्यात असलेल्या नगरपरिषदेच्या विरोधात आक्रमक पावित्रा घेतल्याचे दिसत आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार एकत्र असतांना सत्तार यांच्या ताब्यातील नगरपरिषदेच्या विरोधात भाजपच (Bjp) आंदोलन करत असल्याने याची राज्यभरात चर्चा सुरू आहे.

मोर्चा आणि डफडे वाजवत केलेल्या आंदोलनानंतर १३ फेब्रुवारी रोजी या भरमसाठ करवाढीच्या विरोधात भाजपने शहर बंदचे आवाहन केले आहे. भाजपने नगरपरिषदेवर मनमानी आणि भेदभाव करत अवाढव्य करवाढ केल्याचा आरोप केला आहे. काही ठराविक कालवधीनंतर मालमत्तांचे पुनरावलोकन करून त्यावर कर निर्धारित करणे ही नगर परिषदेची जबाबदारी असते. त्यासाठी अपेक्षित प्रक्रिया पूर्ण न करताच ही करवाढ करण्यात आली आहे.

गेली दोन वर्ष कोरोना महामारीमुळे व्यापारी, शेतकरी, नोकरदार व समाजातील सर्व स्तरावरील नागरीकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. आताकुठे आर्थिक व्यवस्था पूर्व पदावर येत असताना अशा प्रकारची करवाढ ही नागरिकांवर एक प्रकारचा अन्यायच आहे. करवाढ करण्यासाठी मालमत्ता पुनरावलोकन करणे गरजेचे असते. त्यासाठी नेमलेल्या एजन्सीने प्रत्यक्ष जागेवर न जाता मालमत्ता पुनरावलोकन कागदोपत्री केले आहे.

त्यामुळे प्रस्तावित करवाढीत कमालीची तफावत आहे. करवाढ नोटीस देताना नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांकडून राजकीय आणि सामाजिक द्वेषातून पक्षपातीपणाने जवळच्या लोकांना कमी आणि इतर नागरिकांना अव्वाच्या सव्वा कर अशा प्रकारची करवाढ करण्यात आली असल्याचा आरोप देखील भाजपने केला आहे.

Bjp Protest Against Sillod City Council News, Aurangabad
Ajit Pawar : भुमरेंच्या दारू दुकानांचा अजित पवारांकडूनही उल्लेख, म्हणाले एकनाथ महाराजांना काय वाटेल ?

तसेच आक्षेप कालावधी संपल्यानंतर अल्प प्रमाणात कर कमी करुन नवीन नोटीस देण्यात आल्या आहेत. पण दुसऱ्या नोटीसीवर आक्षेप घ्यायचे असल्यास अर्धी रक्कम भरण्याची अट घालण्यात आली आहे. त्याशिवाय आक्षेप नोंदवता येणार नाही, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. हे पूर्णपणे चुकीचे असून एक प्रकारे शहरातील नागरीकांची पिळवणूक असल्याचा देखील आरोप करण्यात येत आहे.

भाजप हे आंदोलन सामान्य नागरिकांसाठी असल्याचा दावा करत आहे, तर नगराध्यक्षांनी मात्र हा राजकीय स्टंट असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर १३ फेब्रुवारी भाजपने दिलेल्या सिल्लोड शहर बंद हाकेला कसा प्रतिसाद मिळतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकंदरित भाजपने अब्दुल सत्तार यांच्याविरोधात पहिल्यांदाच एवढी आक्रमक भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com