Ajit Pawar Visit District Hospital Beed News Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar :अजित पवारांच्या नजरेतून बारीक चुकाही सुटल्या नाही; कंत्राटदाराला म्हणाले, टचप करायला मी येऊ का ?

Beed District Hospital Lab inauguration : एकूण इमारतीच्या कामाबद्दल अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले. परंतु दरवाजाला नसलेले स्क्रू, एसीच्यावर दिसणारे छिद्र आणि भेगा या छोट्या चुकांवरूनही कंत्राटदारांना झापले.

Jagdish Pansare

  1. बीड जिल्हा रुग्णालयातील कॅथ लॅब इमारतीत दिसलेल्या त्रुटींवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.

  2. कंत्राटदाराला थेट सुनावून दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या.

  3. आरोग्य सुविधांच्या उभारणीत दर्जा राखण्यावर पवारांनी स्पष्ट भर दिला.

Ajit Pawar In Beed News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शिस्त आणि नीटनेटकेपणाचा अनुभव नेहमीच येत असतो. विकास कामांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड किंवा वेळकाढूपणा त्यांना खपत नाही. अगदी दौऱ्यावर एखाद्या उद्घाटनासाठी गेले तर त्या इमारतीतील कोपरा न कोपरा बारकाईने न्याहाळून त्यातील त्रुटी अजित पवार शोधून काढतात. यावरून अधिकाऱ्यांची आणि संबंधित कंत्रालदारांची खरडपट्टी त्यांनी केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणासाठी बीड (Beed) दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांच्या हस्ते आज बीड जिल्हा रुग्णालयातील अत्याधुनिक कॅथ लॅब इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी इमारतीतील प्रत्येक रूम मध्ये जाऊन तेथील उपलब्ध सुविधा आणि बांधकामाचा दर्जा त्यातील त्रुटी याकडे कटाक्षाने अजित पवारांनी लक्ष दिले. यावेळी इमारत हस्तांतरित करताना कंत्राटदारानी काही गोष्टी अपूर्ण ठेवल्या. ज्या ठिकाणी एसी लावला होतात त्यावरचे छिद्र बुजवण्यात आलेले नव्हते.

यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) तिथे उपस्थित संबंधित कंत्राटदार कुठे आहे? अशी विचारना अधिकाऱ्यांना केली. एसीच्या वर हे चित्र आणि भेगा कशा दिसतात? असा प्रश्न केला त्यावर थोडे टचप राहिले आहे हे उत्तर ऐकून अजित पवारांचा पारा अधिकच चढला. मग दुपारी वेळ काढून टचप करायला, सिमेंट भरायला मी येऊ का? हे तुमचं नाही कंत्राटदाराचं काम आहे. त्याने काम अपूर्ण का सोडले? असा सवाल केला.

एकूण इमारतीच्या कामाबद्दल अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले. परंतु दरवाजाला नसलेले स्क्रू, एसीच्यावर दिसणारे छिद्र आणि भेगा या छोट्या चुकांवरूनही अजित पवारांनी कंत्राटदारांना झापले. सार्वजनिक बांधकाम विभागाला आपण पैसे देतो, तेव्हा सगळी काम सुरळीत आणि व्यवस्थितच झाली पाहिजे. इतर काम चांगलं करण्याचा प्रयत्न कंत्राटदाराने केला आहे असे म्हणत छोट्या-मोठ्या कामांनाही महत्त्व दिले पाहिजे, ते सुटता कामा नये अशा सूचना अजित पवारांनी तिथे उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

एवढेच नाही तर कॅथ लॅबच्या उद्घाटन कार्यक्रमाला आलेल्या सर्वांना आत शिरताना चपला बाहेर काढा, अशा सूचना स्वत: अजित पवार यांनी दिल्या. आपण निर्माण केलेली वास्तु ही स्वच्छ आणि टापटी ठेवण्याची जबाबदारी आपलीच असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. जनतेला पायाभूत सुविधांबरोबरच आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. कार्डियाक कॅथ लॅबमुळे गोरगरीब रुग्णांना आरोग्याच्या सेवा अधिक दर्जेदार मिळतील,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बीड जिल्हा रुग्णालयात 18 कोटी 72 लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक कार्डिया कॅथलॅबचे लोकार्पण आज अजित पवारांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. प्रत्येक ठिकाणी नर्सिंग कॉलेज बरोबरच पॅरामेडिकल स्टाफ, नर्सेस, वैद्यकीय अधिकारीही उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले.

FAQs

प्र.1. अजित पवार बीड जिल्हा रुग्णालयात का गेले होते?
कॅथ लॅब इमारतीची तपासणी करण्यासाठी ते गेले होते.

प्र.2. कॅथ लॅब इमारतीत काय त्रुटी आढळल्या?
बांधकामातील दर्जा कमी असल्याचे लक्षात आले.

प्र.3. अजित पवारांनी कंत्राटदाराला काय सांगितले?
कामाचा दर्जा कायम ठेवण्याच्या कडक सूचना दिल्या.

प्र.4. या घटनेचा संदेश काय आहे?
सरकारी प्रकल्पात दर्जेदार काम आवश्यक असल्याचा इशारा आहे.

प्र.5. या प्रकरणावर पुढे काय होऊ शकते?
कंत्राटदारावर कारवाई व बांधकामाची गुणवत्ता तपासणी होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT