Beed NCP News Sarkarnama
मराठवाडा

Beed NCP News : आखाडे दुसऱ्यांदा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष..

Maharashtra : मे महिन्यात आखाडे यांची राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : सावता परिषदेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून राज्यभर संघटन बांधणी केलेले कल्याण आखाडे जिल्ह्यातील ओबीसीचा दुसऱ्या फळीतील आश्वासक चेहरा समजले जातात. (Beed NCP News) आता त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाधयक्षपद देण्यात आले आहे. बुधवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते कल्याण आखाडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे सावता परिषदेच्या माध्यमातून माळी समाजाचे संघटन करुन दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यापासून भाजपसोबत काम करत होते. (Beed News) त्यांनी पुढे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासोबतही काम केले. मात्र, भाजपच्या सत्तेत त्यांची उपेक्षा झाल्यामुळे मागच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान २०१९ साली त्यांनी राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

मे महिन्यात कल्याण आखाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. (Marathwada) दरम्यान, अजित पवार यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर आखाडे यांनी त्यांची साथ दिली. आता त्यांना पुन्हा पक्षाने याच पदावर संधी दिली आहे. संत सावता महाराजांचे समाधीस्थान अरणला दरवर्षी ते सावता परिषदेचा भव्य मेळावा घेतात. ओबीसी चळवळीतील तरुण चेहरा म्हणून त्यांची ओळख असून ओबीसीतील दुसऱ्या फळीतील आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

सर्वच घटक व विविध पक्षांतील नेत्यांशी त्यांचे राजकीय संबंध चांगले आहेत. आतापर्यंतच्या निवडणुकांत त्यांनी काम करत असलेल्या पक्षाच्या भूमिकेशी कधीही तडजोड केलेली नाही हे विशेष.जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. नियुक्तीपत्र देताना आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजी गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांची उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT