Nanded News : नांदेडहून आता बंगळुरू-गोव्यासाठी विमानाचे `उडाण`, पण श्रेय कोणाचे ?

Maharashtra : अहमदाबाद शहरातून रोज १८ विमाने उडतात. तर एकट्या महाराष्ट्र राज्यातून फक्त १५ का? असा सवाल चव्हाण यांनी केला होता.
Nanded News, Marathwada
Nanded News, MarathwadaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada : `फ्लाय ९१` या नवीन विमान कंपनीने `उडाण` योजनेंतर्गत नांदेड-बंगळुरू- गोवा ही विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या शिवाय जळगाव-पुणे-गोवा, हैदराबाद, सिंधुदुर्ग-पुणे-बंगळुरू- हैदराबाद, अगात्ती (लक्षद्विप)- बंगळुरू-गोवा या विमानसेवा देखील सदर कंपनीने घोषित केल्या आहेत. (Nanded News) दीर्घ काळापासून हवाईसेवेच्या नकाशातून लुप्त असलेले नांदेड शहर या निर्णयामुळे पुन्हा या नकाशावर दिसणार आहे. तीन दिवसांपुर्वीच विधीमंडळाच्या अधिवेशनात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडहून जाणाऱ्या विमानसेवेचे जाळे विस्तारण्यासंदर्भात मुद्दा उपस्थितीत केला होता.

Nanded News, Marathwada
Maharashtra Electricity Rates: महाराष्ट्रातील वीज दर इतर राज्यांपेक्षा जास्त कसे ? उर्जा सचिवांना नोटीस..

गुजरातच्या अहमदाबाद शहरातून रोज १८ विमाने उडतात. तर एकट्या महाराष्ट्र राज्यातून फक्त १५ का? असा सवालही चव्हाण यांनी उपस्थितीत केला होता. आता हा योगायोग आहे? की मग चव्हाण यांनी विधीमंडळात केलेल्या युक्तीवादाचा परिणाम हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान नांदेडहून नव्या विमानसेवा सुरू करण्याची घोषणा झाल्यानंतर याचे खरे श्रेय कुणाचे? यावरून कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. अशोक चव्हाण, (Ashok Chavan) भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, (Pratap Patil Chikhalikar) आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी यांचे श्रेय आपलेच असल्याचा दावा केला आहे.

यासाठी आपण विमानसेवा सुरू होण्यासाठी कसा पाठपुरावा आणि केंद्रीय उड्डयणमंत्र्यांना पत्रे पाठवली हे सांगण्याचा प्रयत्न तीनही नेते करतांना दिसत आहेत. (Nanded) नांदेडच्या श्री गुरुगोविंदसिंघजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाईट लॅंडिंग आणि जम्बो विमान उतरण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. मात्र, असे असताना देखील नांदेडच्या विमानतळावरुन गेल्या काही महिन्यापासून विमानसेवा बंद होती. तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या परभणी, हिंगोली, लातूर, यवतमाळ, बीड या जिल्ह्यापासून शंभर किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या नांदेड विमानतळावरुन नांदेड ते मुंबई, पुणे, दिल्ली, अमृतसर आणि हैदराबाद विमानसेवा सुरु करावी, अशी मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे करण्यात आली होती.

अखेर याबाबत दखल घेत विमानसेवा लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेडची ठप्प पडलेली विमानसेवा उडाण योजनेंतर्गत पुन्हा सुरू करण्यासाठी १४ डिसेंबर २०२२ रोजी केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले होते. गेल्या २१ जुलै रोजीच त्यांनी महाराष्ट्रातील विमानतळांची दूरवस्था आणि अपुऱ्या विमानसेवेबाबत लक्षवेधी मांडली होती. काही प्रवासी विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना मी वैयक्तिकरित्या भेटून नांदेड व लगतच्या जिल्ह्यांमध्ये असणारी हवाई प्रवासी वाहतुकीची व्यावसायिक संधी निदर्शनास आणून दिली होती.

अखेर आता पहिली विमान सेवा जाहीर झाली असून, पुढील काळात नांदेड- मुंबई व नांदेड- हैदराबादसह इतरही विमान सेवा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करत राहू, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. तर नांदेडच्या विमानतळावरुन नांदेड ते मुंबई, पुणे, दिल्ली, अमृतसर आणि हैदराबाद विमानसेवा सुरु करावी, अशी मागणी केल्यानंतर महाराष्ट्रातील विमानसेवांना गती देण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली होती. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी व पदाधिकाऱ्यांना देखील नांदेड येथून मुंबई, दिल्ली, अमृतसर आणि हैदराबाद विमानसेवा सुरु करण्यासंदर्भात त्यांनी अनुकुलता दर्शवली आहे.

Nanded News, Marathwada
Ambadas Danve News : बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला मान्यता कधी देणार ?

नांदेड शहराचा वाढता विस्तार आणि उद्योग व्यवसायाच्या नवीन वाढीसाठीही विमानसेवा अत्यावश्यक ठरणारी, असल्याचे सांगत खासदार हेमंत पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर केंद्रीय उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नांदेड - गोवा आणि नांदेड - बंगळूरू या मार्गावरील विमान सेवेला हिरवा कंदील दाखवला आहे. एवढेच नाही तर नांदेड विमानतळाचे व्यवस्थापन रिलायन्स कंपनीकडून काढून घेऊन ते एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

नांदेड - गोवा आणि नांदेड - बंगळूरू विमानसेवा सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच नांदेड येथून मुंबई, हैदराबाद, दिल्ली आणि अमृतसर या मार्गावरील विमानसेवा सुरू करण्यासाठी आपला सकारात्मक प्रयत्न आहे. आगामी काळात नांदेड येथून देशभरातील मेट्रो शहरांना जोडण्यासाठी विमानसेवा सुरू झाली तर त्याचा फायदा नांदेडच्या उद्योग व्यवसायाच्या भरभराटीसाठी आणि नांदेड येथे येणाऱ्या भाविकांसाठी निश्चितपणे होईल, असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.