Sharad Pawar, NCP News
Sharad Pawar, NCP News Sarkarnama
मराठवाडा

Sonpeth Bazar Samitee : सर्व पक्षीय मिळून ताकद लावली, पण अखेर राष्ट्रवादीनेच बाजी मारली...

सरकारनामा ब्यूरो

Sonpeth : सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १८ जागेसाठी एकूण ६९ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत पुन्हा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत एकहाती विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)च्या विरोधात सर्व पक्ष एकवटल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असे वाटत होते. पण निवडणूक एकतर्फी झाली.

या निवडणुकीत एकूण ९१९ पैकी ८८१ मतदारांनी मतदाना(Voting)चा हक्क बजावला. यामध्ये विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदार संघात ३०४ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी सर्वसाधारण सहकारी संस्था मतदार संघात २६९ मते वैध ठरली. ३८ मते अवैध ठरली. या मतदारसंघात बालासाहेब जोगदंड १७६ मते, लक्ष्मीकांत देशमुख १८४ मते, विष्णू धोंडगे १६३ मते, रामेश्वर मोकाशे १७३ मते राजेश विटेकर २०० मते, निवृत्ती साठे १७२ व दशरथ सूर्यवंशी १९४ मते घेऊन विजयी झाले.

महिला राखीव मतदार संघात पुष्पा खरात २०० मते, वर्षा यादव २०९ मते घेऊन विजयी झाल्या. इतर मागासवर्गीय मतदार संघात सतीश पारेकर १९३ मते घेऊन विजयी झाले; तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघात उत्तम जाधव २०१ मते घेऊन विजयी झाले.

या निवडणुकीसाठी सत्ताधारी गट विरुद्ध सर्व पक्षीय पॅनल अशी अंतिम लढत झाली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सहकारी संस्था मतदारसंघातून 24 उमेदवार, महिला मतदारसंघातून 8 उमेदवार, इतर मागासवर्गीय मतदार संघातून 4 उमेदवार, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघ 3 उमेदवार, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून 12 उमेदवार, आर्थिक दुर्बल घटकातून 6, आडते व्यापारी गटातून 5 उमेदवार, हमाल मापाडी गटातून 3 उमेदवार अशा एकूण 69 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.

ग्रामपंचायत मतदारसंघात एकूण ३४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी सर्वसाधारण मतदारसंघात ३३४ मते वैध ठरली. आठ मते अवैध ठरली. यामध्ये अंगद रेवले व मदन सपकाळ यांनी प्रत्येकी १९३ मते घेऊन विजयी झाले. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात श्याम अवचारे १९४ मते घेऊन विजयी झाले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघात सावंत सुदाम १९७ मते घेऊन विजयी झाले. व्यापारी मतदारसंघात १७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

यामध्ये १६९ मते वैध ठरली तर चार मते बाद झाली. यात कैलास पंपटवार १४४ मते व अमर वडकर १३६ मते घेऊन विजयी झाले. हमाल व तोलारी मतदारसंघात ५९ मतदारांनी मतदान केले. यापैकी ५८ मते वैध व एक मतदान अवैध ठरले. यामध्ये पठाण सज्जाद खान हे ५१ मते घेऊन विजयी झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा सोनपेठ(Sonpeth) बाजार समितीवर राजेश विटेकर यांनी १८ पैकी १८ जागेवर विजय संपादन करून तालुक्यावर असलेली पकड दिसून आली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT