Sanjay Jadhav Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Jadhav : अंबड-घनसावंगीचं पाणी रोखण्याचा आरोप; खासदार संजय जाधवांनी सांगितलं जायकवाडीच्या पाणीवाटपाचं गणित!

Sanjay Jadhav on Jayakwadi water allocation : अंबड-घनसावंगीचं पाणी रोखल्याचा आरोप होत असताना खासदार संजय जाधव यांनी जायकवाडी धरणाच्या पाणीवाटपाबाबत महत्त्वाची माहिती दिली. नेमका काय आहे पाणीवाटपाचा वाद? जाणून घ्या.

Jagdish Pansare

Water Supply Issue : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी सोडण्यात आलेल्या पाण्याच्या वितरणावरून खासदार संजय जाधव यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून जाब विचारला होता. या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला. अंबड-घनसांवगी भागात पाणी सोडण्यास ते विरोध करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावरून वाद अधिक चिघळू नये यासाठी जाधव यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातूनच आपली भूमिका स्पष्ट केली.

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. यंदा पाटबंधारे विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शासनाने कालव्याच्या पाण्याचे वितरण 'टेल टू हेड' पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच कालव्याच्या शेवटच्या टोकापासून सुरुवातीकडे टप्प्याटप्प्याने पाणी वितरित करायचे आहे. आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर पूर्णा हा भाग टेलला, तर अंबड-घनसावंगी हा भाग हेडला येतो.

त्यामुळे शासनाच्या नियमानुसार पूर्णा भागातील शेतकऱ्यांना आधी पाणी पोहोचणे क्रमप्राप्त आहे. पूर्णा परिसरातील शेतकऱ्यांनी पाण्याबाबतच्या तक्रारी माझ्याकडे मांडल्या आहेत. गेल्या सहा दिवसांपासून ते याच मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या व्यथा लक्षात घेऊनच मी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून शासनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगीतल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

माझ्या वक्तव्याचा अर्थ कोणत्याही शेतकऱ्याला पाणी नाकारावे किंवा त्यांच्यावर अन्याय करावा, असा अजिबात नाही. आधी टेलच्या भागातील शिवार भिजले की त्यानंतर हेडच्या भागातील शेतकऱ्यांनाही नियमानुसार पाणी मिळणारच आहे. पाथरी असो, पूर्णा असो किंवा अंबड-घनसावंगी असो, या सर्व भागांतील शेतकरी आपलेच आहेत. कोणताही भाग माझ्यासाठी वेगळा नाही.

दुष्काळाच्या या कठीण परिस्थितीत प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. पाटबंधारे विभागाने शासनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवावे, हीच माझी भूमिका आहे, असे जाधव यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT