Ambadas Danve-Eknath Shinde News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : `लाडकी बहीण` कार्यक्रमाला प्रत्येकी पन्नास महिला आणण्याचे टार्गेट ; दानवेंचा पुराव्यासह आरोप

Ambadas Danve accuses Ashasevak of bringing 50 women each to Ladaki Baheen program : मुख्यमंत्र्यांच्या रविवारी होणाऱ्या 'स्व कौतुक' सोहोळ्यास आशा अंगणवाडी सेविकांना पिळून घेण्याचे काम आता त्यांच्या कक्षेत आले आहे. सहीपुरती शाई वापरून या अधिकाऱ्यांचे काम संपले.

Jagdish Pansare

Shivsena v/s Shivsena News : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापुर्वी नवनवीन योजना आणि आधी जाहीर केलेल्या उपक्रमांच्या कार्यक्रमांचा धडका सध्या मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे. असाच कार्यक्रम उद्या (ता.6) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये होत आहे. `मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण` योजनेच्या या कार्यक्रमासाठी महिलांची मोठी गर्दी जमवत शक्ती प्रदर्शन करण्याचा या निमित्ताने मुख्यमंत्री व त्यांच्या पक्षाचा आहे.

यासाठी थेट सरकारी यंत्रणेला वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्री आणि महापालिकेचे आयुक्त जी.श्रीकांत यांच्यावर टीका केली आहे. लाडकी बहीण योजनेला महिलांची गर्दी जमवण्यासाठी आशासेविकांना प्रत्येकी महिला घेऊन येण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.

या संदर्भातील पत्र पोस्ट करत अंबादास दानवे यांनी महिलांना पंधराशे रुपये देऊन सुद्धा गर्दी होणार नाही, याची खात्री पटल्यामुळे आशासेविकांना टार्गेट देण्यात आल्याचा टोला लगावला आहे. या संदर्भात अंबादास दानवे यांनी ट्विट केले असून सनदी आणि अन्य अधिकाऱ्यांना गलेलठ्ठ पगार मिळतो तो जनतेच्या सेवेसाठी.

मुख्यमंत्र्यांच्या रविवारी होणाऱ्या 'स्व कौतुक' सोहोळ्यास आशा अंगणवाडी सेविकांना पिळून घेण्याचे काम आता त्यांच्या कक्षेत आले आहे. सहीपुरती शाई वापरून या अधिकाऱ्यांचे काम संपले. (Eknath Shinde) मात्र, तुटपुंज्या मानधनात असंख्य कामे करणाऱ्या या आशासेविकांना प्रत्येकी 50 महिला आणण्याचे टार्गेट देणे हा त्यांच्यावर एका अर्थाने जुलूम आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

पंधराशे रुपये दरमहा देऊनही महिला कार्यक्रमाला येणार नाहीत याची बहुदा खात्री झाल्याने आशा सेविकांना पिळून घेतले जात आहे. टार्गेट पूर्ण न झाल्यास कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर आहेच! मुख्यमंत्र्यांच्या या रविवारच्या 'मला पहा फुलं वाहा' सोहोळ्यास आता एका पत्रावर शहरातील 30 स्मार्ट बस देण्यात आल्या आहेत.

मग याचे बिल, त्या गाड्यातील डिझेल हे कोण देणार ? असे एका पत्रावर रुपया न घेता सामान्य माणसाला तुम्ही यापुढे अशा बस देणार का आयुक्त जी. श्रीकांत !, असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थितीत केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT