Ambadas Danve News : देवेंद्रजी तुमच्या चेल्यांना आवरा, शिवसैनिकाला मारहाण होताच दानवेंचा इशारा

Attack on Shiv Sainika angered Ambadas Danve warned Fadnavis, Chikhlikars :नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचे अपहरण करून बोटे छाटण्यात आल्याचा हादरवून टाकणारा प्रकार काल समोर आला.
Ambadas Danve and Devendra Fadnavis
Ambadas Danve and Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nanded Shivsena Activits Attack News : नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख वडवळे यांना फेसबुक पोस्ट टाकल्याच्या कारणावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केली. या हल्यात वडवळे यांची दोन बोटे तुटली. या जीवघेण्या हल्यावर शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला.

देवेंद्र जी, तुमच्या या चेल्यांना आवरा. एखाद्या सोशल मीडिया पोस्ट वरून अशी मारहाण करणे कोणत्या बौध्दिकात शिकवले जाते? आणि हो, मिस्टर चिखलीकर! याचा हिशेब ठेवला जाईल आणि योग्यवेळी तो सेटल पण केला जाईल. तुमचे कार्यकर्ते नांदेड आणि इथले लोक आपली जागिर समजत असतील तर ते मूर्खाच्या नंदनवनात हिंडत आहेत, अशा शब्दात दानवे (Ambadas Danve) यांनी संताप व्यक्त केला.

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचे अपहरण करून बोटे छाटण्यात आल्याचा हादरवून टाकणारा प्रकार काल समोर आला. हल्ला करणारे भाजपचे पदाधिकारी असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हल्लोखोरांच्या अटकेसाठी लोहा-कंधार बंदचा इशारा दिला होता. मंगळवारी रात्री हा भयंकर प्रकार घडला होता.

Ambadas Danve and Devendra Fadnavis
Shivsena Leader Ambadas Danve News : भाजप नेत्यांचे `भर अब्दुल्ला गुड थैली मे`, अंबादास दानवेंचा बावनकुळे, महाजनांना टोला

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख संतोष वडवळे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टमुळे वाद निर्माण झाला आणि नांदेड शहरापासून जवळच असलेल्या तुप्पा शिवारातील एका धाब्यावरून वडवळे यांचे काहीजणांनी अपहरण केले. (Devendra Fadnavis) अज्ञात ठिकाणी नेल्यानंतर वडवळ यांना बेदम मारहाण करण्यात आली. हल्लोखोर एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी वडवळे यांची दोन बोटे छाटली.

या हल्ल्याचे पडसाद उमटत असून शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि भाजपचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. या सगळ्याचा हिशेब ठेवला जाईल, असा थेट इशारा दानवे यांनी दिल्याने हे प्रकरण चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ambadas Danve and Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाची नासधूस प्रकरण पोलिसाला भोवलं; केली मोठी कारवाई

चिखलीकर आणि फडणवीस यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट टाकल्याच्या रागातून शिवसैनिकावर हल्ला झाल्याचे सांगितले जाते. हल्लेखोर हे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे समर्थक असल्याचा आरोप हल्ला झालेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com