Shiv Sena UBT leader Ambadas Danve addressing media over the Parbhani Muslim Mayor controversy and responding sharply to BJP criticism. Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Parbhani Mayor : मुस्लिम महापौरावरून आम्हाला ज्ञान पाजणाऱ्या लुंग्या-सुंग्यांना स्वतःच्याच पक्षाचा विसर पडलायं! अंबादास दानवेंनी भाजपला सुनावले

Parbhani Mayor Muslim controversy : परभणीत मुस्लिम महापौर निवडीवरून अंबादास दानवे यांनी भाजपावर टीका केली. भाजपच्या मुस्लिम नेत्यांची आठवण करून देत शिवसेना यूबीटीने आपल्या निर्णयाचे समर्थन केले.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुस्लिम महापौर केला आणि सगळेच राजकीय पक्ष ठाकरेंच्या पक्षावर तुटून पडले. कोणी जनाब सेना, तर कोणी हिंदूत्व सोडले म्हणून, तर कोणी मुंबईत मराठीचा आग्रह धरणाऱ्या उद्धव ठाकरेंना परभणीत मुस्लिम महापौर कसा चालतो? असे प्रश्न उपस्थित करत टीकेची झोड उठवली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी या टीकेला जशास तसे उत्तर दिले आहे. अंबादास दानवे यांनी तर भाजपाला स्वतःच्या पक्षातही बघा असे म्हणत टोला लगावला आहे. परभणीत मुस्लिम महापौर झाला आणि इकडे भाजपच्या अनेक 'विद्वानांची' मूळव्याध अचानक जिवंत झाली! खिशातून मोबाईलची डबडी काढून ज्ञान पाजणाऱ्या या 'लुंग्या-सुंग्यांना' बहुधा स्वतःच्याच पक्षाचा विसर पडलाय.

भाजपच्या 'पावन' गंगेत न्हाऊन निघालेली ही नावं वाचताना चष्मा नीट लावा. सिकंदर बख्त (संस्थापक सदस्य!), शाहनवाज हुसेन, मुख्तार अब्बास नकवी, नजमा हेपतुल्ला, एम.जे. अकबर, सय्यद झफर इस्लाम, जमाल सिद्दीकी, अब्दुल रशीद अन्सारी, पाशा पटेल, हैदर आझम. या सर्वांना भाजपने मंत्री-खासदार केलं, तेव्हा तुमची ही मूळव्याध कुठे झोपली होती? असा सवाल दानवे यांनी भाजपाला केला आहे.

​महापौरांना मतदान करणारे आणि निवडून आणणारे नगरसेवक 'हिंदू'ही आहेत, पण पोटशूळ उठलाय समाजमाध्यमांवरील पोराटोरांना! साबेर शेख मंत्री असताना मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते, हा इतिहास वाचायला बुद्धी लागते. काल आलेल्यांनी जिंतूरच्या उपनगराध्यक्षपदी कोण बसलंय ते बघावं आणि मगच जगाला 'ज्ञानामृत' पाजावं, असा टोलाही अंबादास दानवे यांनी भाजपाच्या नेत्यांना लगावला आहे.

दरम्यान, परभणीचे महापौर हे शिवसेनेचे गेले अनेक वर्षापासूनचे निष्ठावंत शिवसैनिक आणि तालुका प्रमुख असल्याचे सांगितले जाते. खासदार संजय जाधव यांनी जेव्हा परभणीत शिवपुराण कथेचे आयोजन केले होते. तेव्हा आपल्या साठ एक शेतावरील पिकांवर नागंर फिरवून कथेसाठी जागा उपलब्ध करून देणारा, एक मुसलमान म्हणजेच आता महापौर झालेले सय्यद इक्बाल हेच होते, अशा पोस्ट देखील समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT