Sambhajinagar Mayor : देवाभाऊंनी 'श्रेयाचा पेढा' कोणाला भरवला? संभाजीनगरमध्ये भाजपचा महापौर बसताच आमदार अन् शहराध्यक्षांमध्ये चढाओढ

Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपने 57 जागांसह महापौरपद मिळवले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर स्थानिक नेत्यांमध्ये श्रेयाची स्पर्धा रंगली आहे.
Chief Minister Devendra Fadnavis congratulates BJP leaders from Chhatrapati Sambhajinagar after Samir Rajurkar becomes Mayor, amid internal competition over political credit.
Chief Minister Devendra Fadnavis congratulates BJP leaders from Chhatrapati Sambhajinagar after Samir Rajurkar becomes Mayor, amid internal competition over political credit.Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपने स्वबळावर महापौर बसवला. शहराच्या इतिहासात पहिल्यांदा स्थानिक नेत्यांना मोठ्या भावाच्या भूमिकेत पक्षाला आणण्यात यश आले. आता या यशाचे श्रेय कोणाचे? यावरून स्थानिक नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. महापौर पदी विराजमान झाल्यानंतर समीर राजूरकर यांना घेऊन मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर, शहरजिल्हाध्यक्ष किशोर शितोळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात हजेरी लावून आले.

देवाभाऊंनी सगळ्यांना पेढा भरवत भाजपच्या शतप्रतिशत यश आणि महापौर पदाबद्दल अभिनंदन केले. आता ज्याला ज्याला फडणवीसांनी पेढा भरवला, तो प्रत्येक जण या यशाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. 'महापालिका निवडणुकीतील यशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला पेढा भरवला' असे फोटोसह सिद्ध करणारी निवेदने काढत आमदार संजय केणेकर आणि शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी श्रेयाचा पेढा खाण्याचा प्रयत्न चालवला आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत 57 जागा जिंकत भाजपने जोरदार कामगिरी केली. मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह भाजपच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकीत जबाबदाऱ्या उचलल्या होत्या. निकालानंतर मात्र भाजपमध्ये श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. काही नेत्यांनी आपल्यामुळेच भाजपला यश मिळाल्याचे भासवत श्रेय घेण्याचा प्रत्यत्न सुरु केला.

Chief Minister Devendra Fadnavis congratulates BJP leaders from Chhatrapati Sambhajinagar after Samir Rajurkar becomes Mayor, amid internal competition over political credit.
Parbhani Mayor election : परभणीच्या मुस्लिम महापौरावरून राजकीय युद्ध पेटलं! एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,'खरा चेहरा...'

त्याचा कळस दोन दिवसांपूर्वी पाहायला मिळाला. समीर राजूरकर महापौर झाल्यानंतर त्यांना घेऊन स्थानिक नेत्यांनी मुंबई गाठत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी पेढे वाटण्यात आले. त्यात मुख्यमंत्र्यांनी सर्वांना पेढे भरवले. पण मुख्यमंत्र्यांनी मला पेढा भरवला हे सांगत शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी समाज माध्यमांवर फोटोसहित जाहीर केले. इतकेच नव्हे तर माध्यमांकडेही तशाच प्रेस नोटही धाडल्या.

Chief Minister Devendra Fadnavis congratulates BJP leaders from Chhatrapati Sambhajinagar after Samir Rajurkar becomes Mayor, amid internal competition over political credit.
Sanjay Shirsat vs Rajendra Janjal : राज्याचे मुख्यमंत्री होवोत, माझ्या त्यांना शुभेच्छा! शिरसाटांचा पक्षातील विरोधकावर स्ट्राईक

पाठोपाठ आमदार संजय केणेकर यांनीही हुबेहूब तशीच प्रेसनोट काढत मुख्यमंत्र्यांनी मला पेढा भरवला हे जाहीर करून टाकले. गंमत म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या सर्वच नेत्यांना पेढा भरवला होता. पण भाजपमधील या दोन नेत्यांच्या या श्रेयाचा पेढा खाण्यासाठी चाललेली धडपड मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना खमंग चर्चेसाठी खाद्य ठरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com