CJP Protest News : निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काॅक्रोच जनता पार्टीसह देशभरातील विरोधक आज दिल्लीच्या जंतरमंतरकडे कूच करत आहेत. यापुर्वी सीजेपीच्या आंदोलनाने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास सरकारला भाग पाडले होते.
आता ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्ली पुन्हा मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहे. मात्र आंदोलक दिल्लीत पोहचू नये, याचा बंदोबस्त सरकारकडून केला जात आहे. काॅक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके व त्यांच्या साथीदारांना दिल्ली विमानतळावर उतरण्याआधीच पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
दिल्लीत मेट्रो, इंटरनेट सेवा बंद केल्यानंतर देशात आणबाणी लावण्यात आल्याची टीका विरोधकांकडून होऊ लागली आहे. अशातच अभिजीत दिपके व त्यांच्या साथीदारांना पोलीसांनी विमानातच अटक केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी दिल्ली पोलीस, केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
विमानातून हवेतल्या हवेत आंदोलक ताब्यात? हॉलिवूडच्या जेम्स बाँडने किंवा टॉमक्रूझने थेट लाजून कोपऱ्यात उभं राहावं, असा थरारक ॲक्शन ड्रामा सुरू असल्याचा टोला त्यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमधून लगावला आहे.
अहो राव, तुम्ही पण ना!
व्यवस्थेच्या त्या गोंडस, सो कॉल्ड 'निष्पाप आणि लाडक्या' अधिकाऱ्याची एवढीही काळजी सरकारने घ्यायची नाही का? शेवटी लोकशाहीचा खरा 'जावईबापू' तोच तर आहे! विमानातून हवेतल्या हवेत आंदोलक ताब्यात? हॉलिवूडच्या जेम्स बाँडने किंवा टॉमक्रूझने थेट लाजून कोपऱ्यात उभं राहावं, असा थरारक ॲक्शन ड्रामा सुरू आहे, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी दिल्लीतील घडामोडीवरून सरकारला सुनावले.
आणि बाकीच्या सुविधा तर बघा, म्हणत...
१. इंटरनेट बंद: जेणेकरून जनतेच्या डोळ्यांना स्क्रीनचा त्रास न होता 'डिजिटल डिटॉक्स' घडावा!
२. मेट्रो आणि रेल्वे बंद: पायी चालल्याने आरोग्य सुधारतं, हा आरोग्य खात्याचा गुप्त संदेश असावा!
३. आंदोलक ताब्यात: मोफत सरकारी चहापाणी आणि तात्पुरती हॉस्टेल सुविधा!
४. आणि ४० हजार पोलिसांचा पहारा: सीमेवर शत्रू आला तरी एकवेळ चालेल, पण या लाडक्या साहेबांच्या कॉलरवर चुकून धूळही उडता कामा नये!
जगाच्या पाठीवर असा राजेशाही बंदोबस्त फक्त दोनच व्यक्तींना मिळतो.. एक तर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, आणि दुसरे म्हणजे आपल्या व्यवस्थेतले हे 'अतिदुर्मीळ' अधिकारी! एवढं जीवापाड प्रेम कोणीच कोणावर केलं नसेल.. अगदी रोमियो-ज्युलिएट यांची कथा फिकी पडावी.. याला म्हणतात, "सबका साथ... आणि फक्त साहेबांचा विकास, अशा शब्दात ठाकरेंच्या पक्षाने मोदी सरकार यांच्यावर टीका केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.