CJP Protest : CJP आंदोलनाच्या मागे कोण? भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांचा मोठा दावा, थेट नावच सांगितले

CJP protest update News : दिल्लीत जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या CJP आंदोलनाशी संबंधित प्रमुख व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Nitin Nabin
Nitin Nabin Sarkarnama
Published on: 
Updated on: 

New dehli News : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. जयला चार दिवसापासून आक्रमकपणे आंदोलन सुरु असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता दिल्लीच्या जंतर-मंतरवर शनिवारी आंदोलन करण्याचे नियोजन कॉकरोच जनता पार्टी आणि काही विद्यार्थी संघटनांनी केले होते. मात्र, दिल्ली पोलिसांकडून या आंदोलनाला परवानगी देण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे दिल्ली विमानतळावरून सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके, सौरव दास यांना दिल्ली विमनातळावरच ताब्यात घेण्यात आले. तर दुसरीकडे या आंदोलनाविषयी मोठे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी केले असून या आंदोलनामागे नेमके कोणाचा हात आहे, त्यांचे थेट नावाच सांगितले.

शनिवारी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या CJP आंदोलनाशी संबंधित प्रमुख व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. CJP चे संस्थापक अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली विमानतळावर विमानातून उतरताच ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे दिल्लीतील वातावरण चांगलेच तापले आहे. महिला पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. ताब्यात घेण्यात येत असताना दीपके यांनी आपण अटक होण्यासाठीच आल्याचे पोलिसांना सांगितले.

दिल्ली पोलिसानी शनिवारी सकाळीच (CJP) च्या लीगल टीमच्या प्रमुख रत्ना सिंह यांनाही अटक केली. तयासोबतच प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी यांनाही गुरुग्राम पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले. या सर्व अटकेमुळे CJP आंदोलनाभोवती नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. त्यातच भाजप नेते नितीन नवीन यांनी या आंदोलनावर टीका केली आहे. देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Nitin Nabin
Pune MPSC Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांवरील गुन्हे म्हणजे मग्रुरी, 'वंचित'कडून सरकारवर टीका

या आंदोलनामागे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडीया’ आघाडी आणि अरविंद केजरीवाल यांचे समर्थक CJP गट असल्याचे प्रसार माध्यमाशी बोलताना भाजप नेते नितीन नवीन यांनी सांगितले. या दोन्ही गटांकडून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नवीन यांनी केला आहे. जनतेने नाकारलेल्या या शक्तींचे मनसुबे यशस्वी होणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Nitin Nabin
आक्रमक भाषणांनी अन् कोल्हापुरी शब्दांनी MPSC चं आंदोलन गाजवतोय... कोण आहे विवेकानंद पाटील...?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com