Shivsena UBT: राज्याचे सामाजिक न्याय तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या शहरातील गोलवाडी भागात असलेल्या बंगल्यासमोर काल मध्यरात्री काही मद्यपींनी गोंधळ घातला. सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्याने हटकल्यानंतर त्यांच्याशी झटापट केली. या गोंधळात बंगल्याच्या दिशेने दारूच्या बाटल्याही भिरकावण्यात आल्या. या प्रकारामुळे संजय शिरसाट चांगलेच संतापले आणि त्यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यावरच हल्लाबोल केला.
ते वसुलीत गुंतले असल्याचा आरोप करत शहरात दिवसाढवळ्या पडणारे खून, दरोडे, नशेखोरी याचा पाढाच वाचला. आयुक्तांचा फोन बंद असल्याचा आरोप करत त्यांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांनाच रात्री फोन केला होता. यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा गृहखाते आणि महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
तब्बल '३३ देशांनी' दखल घेतलेले मंत्री शिरसाट यांच्या घरावरील हल्ला हा राज्याच्या गृहखात्याची भीती कितपत उरली आहे हे दाखवतो. राज्यात मंत्र्यांच्या घरांवर, सिने अभिनेत्यांच्या गाड्यांवर गोळीबार होतो मग सामान्य माणसाची अवस्था काय? यावर फार न बोललेले बरे! ज्या सरकारला त्यांच्या मंत्र्यांचे घरं राखता येत नसतील ते लोकांना काय आधार देणार? असा टोला दानवे यांनी लगावला आहे.
दुष्काळामध्ये भरडल्या जात असलेल्या शेतकऱ्यांना महायुती सरकारने दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम थेट खात्यात देण्याचे जाहीर केले होते. पण हे पैसे बँका कर्जखात्यात वळते करून घेत आहेत? अशा तक्रारी समोर येत आहेत. एका वृत्तपत्राच्या बातमीचा हवाला देत, अंबादास दानवे यांनी मदत शेतकऱ्यांसाठी केली की बँकांसाठी? असा सवाल दानवे यांनी केला आहे.
दिवाळीच्या निमित्ताने शेतकऱ्यांना दिलेले ५ हजार रुपये बँका कर्जखात्यात वळते करत असतील, तर ही मदत शेतकऱ्यांसाठी होती की बँकांसाठी? ७,५०० कोटींची तरतूद करून शेतकऱ्यांच्या हातात दमडीही पडणार नसेल, तर हा कसला शेतकरी सन्मान? सरकारने तातडीने बँकांना रक्कम परत बचत खात्यात जमा करण्याचे निर्देश पत्राद्वारे द्यायला हवेत, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.