Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पुत्र धर्मराज यांचा विवाह सोहळा शुक्रवारी पार पडला. या विवाह सोहळ्यास राज्यातील दिग्ग्ज नेतेमंडळींनी हजेरी लावली. या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच वरपिता अंबादास दानवे यांनी लग्न सोहळ्याच्या मांडवात जातीने उपस्थित राहून सर्व पाहुणेमंडळींच्या पाहुणचाराकडे जातीने लक्ष ठेवून होते. यावेळी त्यांनी तयारी करताना स्वतः काही वेळासाठी आचारी होत काही काळ त्यांनी पुऱ्या तळत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
शहरातील २२ एकरच्या परिसरात हा जंगी विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी परिसरात शाही मंडप उभारण्यात आला आहे. चार एकराच्या परिसरात राजवाड्याची प्रतिकृती असलेला मंडप, तसेच या मंडपात लावण्यात आलेले राजेशाही झुंबर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या विवाह सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या विवाहस्थळी मोठी गर्दी होणार असल्याने व भोजनासाठी मोठ्या संख्येने नागरिक येणार असल्याने सर्वसामान्य, व्हीआयपी व व्हीव्हीआयपी अशा तीन विभागांत भोजनव्यवस्था करण्यात आली होती. या सर्व व्यवस्थेवर अंबादास दानवे स्वतः लक्ष ठेवून होते, विशेषतः यावेळी त्यांनी भोजनव्यवस्थेची पाहणी करताना स्वतः काही वेळासाठी आचारी झाले होते. यावेळी काही काळ त्यांनी आचाऱ्याप्रमाणे पुऱ्या तळत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुऱ्या तळतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हळदी समारंभावेळी केला डान्स
लग्नाच्यानिमित्ताने हळदी समारंभ आयोजिण्यात आला होता. त्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी नृत्य करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी यावेळी केलेल्या डान्सचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दिग्गजांना दिले होते निमंत्रण
या विवाह सोहळ्याचे राज्यातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav thackrey), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री व आमदाराना निमंत्रण दिले होते.
(Edited by Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.