Sanjay Shirsat-Ambadas Danve News
Sanjay Shirsat-Ambadas Danve News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : अडचणीत आणू पाहणाऱ्या शिरसाटांविरोधात संधी मिळताच दानवेंची पोलिसात तक्रार..

सरकारनामा ब्युरो

Shivsena : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर आमदार संजय शिरसाट यांनी पदाधिकारी मेळाव्यात बोलतांना आर्वाच्य भाषेत टीका केली होती. विशेष म्हणजे ती करत असतांना शिरसाट यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचे नाव घेत त्यांची देखील कोंडी केली होती. यावरून दानवे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा देखील झाल्या. यावर स्पष्टीकरण देतांना दानवेंच्या नाकीनऊ आले. पण संधी मिळताच दानवे यांनी देखील शिरसाटांच्या आरोपांची परतफेड केली.

सुषमा अंधारे यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरल्याचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाच्या महिला आघाडीने आज निदर्शने केली. शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या फोटोला शेण फासत संताप व्यक्त केला. (Shivsena) एकीकडे महिला आघाडी आक्रमक झाली असतांना दुसरीकडे अंबादास दानवे यांनी देखील संजय शिरसाट यांच्या विरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. शिरसाट यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

२६ मार्च रोजी आमदार संजय शिरसाट यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध अत्यंत अर्वाच्य भाषा वापरत टीका केली होती. शिरसाठ यांच्या विरोधात भा.दं. वि. च्या कलम ३५४(अ) अनव्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार दानवे यांनी लेखी स्वरूपात केली आहे.

सुषमा अंधारे यांचा आमच्या डोक्याला ताप झाला आहे, अशी माहिती आपल्याला अंबादास दानवे यांनी फोनवरून दिली होती, असे संजय शिरसाट यांनी जाहीर भाषणात सांगितले होते. त्यानंतर आपण कधीही शिरसाट यांना फोन केला नव्हता, असा खुलासा दानवे यांना करावा लागला होता. आता त्याच सुषमा अंधारे प्रकरणाचा लाभ उठवत दानवेंनी शिरसाट यांच्याविरोधात तक्रार दाखल करत संधी साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT