NCP Activits Join Shivsena: परभणीत राष्ट्रवादी- काॅंग्रेसला दणका, सरपंच, माजी नगरसेवकांसह शेकडो पदाधिकारी शिंदे गटात..

Ncp : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य जलील पटेल यांचा समावेश आहे.
Ncp-Congress Activits Join Shivsena News, Parbhani
Ncp-Congress Activits Join Shivsena News, ParbhaniSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News: राज्यातील सत्तातरानंतरही जिल्ह्याचे खासदार, आमदार उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. शिंदे (Eknath Shinde) गटाला इथे फोडाफोडीत फारसे यश मिळाले नव्हते. परंतु सत्तांतरानंतर नऊ महिन्यात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शिंदे गटाने ठाकरे गटाकडे आपला मोर्चा वळवला पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र महाविकास आघाडीतले घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी व काॅंग्रेसला मात्र शिंदे गटाने मोठा हादरा दिल्याचा दावा केला जातोय.

Ncp-Congress Activits Join Shivsena News, Parbhani
Ambadas Danve On Eknath Shinde: आता झाले ना नऊ महिने, `वाचू का` विचारणाऱ्या मुख्यमंत्र्यांना टोला..

तब्बल १०१ सरपंच, ३४ माजी नगरसेवकांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. (Parbhani) मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन या निवासस्थानी काल रात्री हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. शिंदे गटाने राष्ट्रवादीसोबतच (Ncp) काॅंग्रेसला दणका दिल्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात सुरू आहे.

परभणीतील शिवसेना युवानेते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या सर्वांना भगवा झेंडा हातात देवून त्यांच्या शिवसेनेत प्रवेश करून घेण्यात आला. राष्ट्रवादी, काॅंग्रेससह विविध पक्षातील १०१ ग्रामपंचायतिचे सरपंच , ३४ माजी नगरसेवक, शेकडो महिला- पुरुष पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य जलील पटेल यांचा देखील समावेश आहे. परभणी जिल्ह्यातुन आतापर्यंत २०१ सरपंच, ६४ नगरसेवकानीं शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा केला जातोय. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जाते.सईद खान हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निकटवर्ती असून राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार बाबाजानी दुराणी यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.

बाजार समिती,नगरपालिका व जिल्हापरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी व बाबाजानी दुराणी यांच्यासमोर शिंदेसेनेचे मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, मध्यंतरी सईद खान यांनी आमदार बाबाजाणी दुराणी हेच शिंदे गटात येणार असल्याचा दावा केला होता. या संदर्भात माजी मंत्री व शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्यांशी त्यांचे फोनवरून बोलणे झाल्याचा दावा देखील करण्यात आला होता. मात्र दुराणी यांनी स्वतः खोतकरांना फोन करून खान यांना खोट्या अफवा पसरवण्यापासून रोखा, असे सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com