Ambadas Danve News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : दानवेंनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ..

Shivsena : वंचित बहुजन आघाडीसोबत युती झाली आहे, तेव्हापासून अशा प्रकारचा खोडसाळपणा विविध लोकांकडून सुरू आहे.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : थायलंडचे बोद्ध धर्मगुरू औरंगाबादेत आले असता विमानतळावर राजशिष्टाचार म्हणून तिथल्या अधिकाऱ्यांनी बौध्द मुर्ती ठेवली होती. परंतु यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी इथे बौध्द मूर्ती कशाला ठेवली तुम्हाला हेचं काम आहे का ? असे म्हणत धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप दलित संघटनांकडून केला जातोय. दानवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी देखील होत आहे.

मात्र, हा सगळा प्रकार राजकीय सुडबुद्धीने सुरू असून आपण बौद्ध धर्मगुरुंच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. (Shivsena) जशी स्वागताची तयारी केली, तशीच त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्या, हे मी त्यांना सांगत होतो. (Aurangabad) पण मी कुठे तरी भगवान गौतम बुद्धांच्या मुर्तीला विरोध केला, असा विपर्यास काही लोक करत आहेत. आपण कुठल्याही प्रकारे कुणाचा अवमान केलेला नाही, असे स्पष्टीकरण दानवे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.

दानवे म्हणाले, बौद्ध धर्मगुरू विमानतळावर येणार म्हणून बरीच गर्दी झाली होती. त्यांच्या स्वागताची तयारी विमानतळ प्राधिकरणाच्या काही अधिकाऱ्यांनी केली होती. या गर्दीमुळे त्यांना त्रास होवू नये, त्यांच्या सुरक्षेची व्यवस्थीत काळजी घ्यावी, या संदर्भात मी आधीच विमानतळावरच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.

परंतु त्यानंतर सोशल मिडियावर चुकीच्या पद्धतीने पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. जेव्हापासून शिवसेनेची वंचित बहुजन आघाडीसोबत युती झाली आहे, तेव्हापासून अशा प्रकारचा खोडसाळपणा विविध लोकांकडून सुरू आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेवून जाणारा मी कार्यकर्ता आहे. पण काही लोकांना याची विपर्यास केला. महालगाव येथे झालेला प्रकार देखील असाच होता.

मी कुठेही भगवान गौतम बुद्धांच्या मुर्तीचा अवमान केलेला नाही, कृपया कुणीही गैरसमज करून घेवू नये, असेही दानवे यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे शिवसेना दलित आघाडीने देखील दानवे यांच्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे, खोटे असल्याचे म्हटले आहे. बदलते राजकीय समीकरण पाहता खोडसाळपणे केलेला हा खटाटोप अतिशय हुशारीने नियोजन पद्धतीने केला आहे. अशा प्रकारच्या पोस्ट आणि खोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन. शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा संघटक राजीव वाकुडे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT