Amit Deshmukh : सांस्कृतिक शहर म्हणून लातूरचा उल्लेख, मला वाटलं नागपूर म्हणाल ; अभिमन्यू पवारांना टोला..

Marathwada : कारण त्यांचे आणि नागपूरचे संबंध किती घनिष्ठ आहेत हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे.
Mla Amit Deshmukh-Abhimanyu Pawar News, Latur
Mla Amit Deshmukh-Abhimanyu Pawar News, LaturSarkarnama
Published on
Updated on

Latur : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख, भाजपचे अभिमन्यू पवार, खासदार सुधाकर श्रृंगारे (Sudhakar Shirngare) हे आज एकाच व्यासपीठावर आले होते. निमित्त होते लातूर येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे. यावेळी या तिन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात ऐकमेकांना चिमटे काढले.

Mla Amit Deshmukh-Abhimanyu Pawar News, Latur
Mp Sudhakr Shringare News : विलासराव देशमुख गेल्यानंतर लातूरची प्रगती खुंटली..

आमदार अमित देशमुख यांनी अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांच्या भाषणातील एका मुद्यावरून त्यांना चांगलाच टोला लगावला. लातूर जिल्ह्याचे वर्णन करतांना अभिमन्यू पवार यांनी पुण्यानंतर राज्यात सांस्कृतिक शहर म्हणून कोणत्या जिल्ह्याचे नाव घेतले जात असेल तर ते लातूरचे असा उल्लेख केला होता. त्यावर अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी आपल्या भाषणात त्यांना चिमटा काढला.

अमित देशमुख म्हणाले, अभिमन्यू पवारांनी त्यांच्या भाषणात पुण्यानंतर सांस्कृतिक शहर म्हणून लातूरचा उल्लेख केला. याचा मला मनापासून आनंद वाटला. खरतंर ते पुण्यानंतर नागपूरचे नाव घेतील, असे मला वाटले होते. कारण त्यांचे आणि नागपूरचे संबंध किती घनिष्ठ आहेत हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे.

पण त्यांनी सांस्कृतिक शहर म्हणून लातूरचा उल्लेख केला, याचा मला विशेष आनंद झाला. लातूरमध्ये विलासराव देशमुख साहेबांच्या काळातापासून खेळाला, खेळांडूना प्रोत्साहन देण्याचे धोरण राहिले आहे. ते मुख्यमंत्री असतांना लातूर येथे विभागीय क्रिडा संकुल मंजुर करण्यात आले होते. पण जागा आणि निधी उपलब्ध न झाल्याने ते होवू शकले नाही.आता जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन हेच राज्याचे क्रिडा मंत्री देखील आहेत. त्यामुळे अभिमन्यू पवार, खासदार श्रृंगारेसाहेब यांनी पाठपुरावा करून या विभागीय क्रिडा संकुलाला वेग द्यावा.

या शिवाय खो-खो, कबड्डी, रेसलिंग या खेळासाठीचे ट्रेनिंग सेंटर, प्रबोधनी देखील लातूरमध्ये तयार झाले पाहिजे. या जिल्ह्यात व्हाॅलीबाॅल खेळणारे खेळाडून प्रचंड आहेत. त्यासाठी किमान एक हजार मैदाने येथे असतील. तेव्हा खेळाला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारून क्रीडा संकूल, ट्रेनिंग सेटरसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी माझी मागणी असल्याचेही अमित देशमुख म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com