Opposition Leader Ambadas Danve News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : हे सरकारच अदानींच्या ताब्यात देवून टाका, अंबादास दानवे का संतापले ?

Shivsena : राज्याच्या आर्थिक नियोजन परिषदेच्या सदस्य यादीमध्ये करण अदानी यांचा समावेश करण्यात आला आहे.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra : देशात सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप उद्योगपती गौतम अदानी (Guatam Adani) यांच्यावर केला जातोय. एलआयसीसह विविध कंपन्यांची हजारो कोटींची गुंतवणूक यामुळे धोक्यात आली असून सर्वसमान्य लोकांचा पैसा बुडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

असे असतांना केंद्र आणि राज्य सरकार यांचे मात्र अदानी यांच्यावरील प्रेम कमी व्हायला तयार नसल्याचे दिसते. (Shivsena) राज्याच्या आर्थिक नियोजन परिषदेच्या सदस्य यादीमध्ये करण अदानी यांचा समावेश करण्यात आला आहे. (Aurangabad)

या संदर्भातील शासनाचे परिपत्रक जारी झाले असून त्याचा हवाला देत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. अदानींसाठी सरकार चालवण्यापेक्षा हे राज्य सरकार त्यांच्याच ताब्यात देऊन टाका!

कशाला ते तरी चालवता. आर्थिक परिषदेच्या सदस्य यादीत अदानी आॅनलाईनचे करण अदानी यांचा समावेश करून हे सरकार कोणासाठी काम करते, हे स्पष्ट झाले. हे महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही, असे ट्विट करत दानवे यांनी संताप व्यक्त केला आहे. .

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT