Ambadas Danve- CM Eknath Shinde News
Ambadas Danve- CM Eknath Shinde News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : शिंदे गटाला विधानसभेला ४८ जागा ? अरेरे मिंधे गॅंगची हीच किंमत का ?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केलेले भाषण सध्या चांगलेच चर्चेच आले आहे. या भाषणात विधानसभेला भाजप २४० हून अधिक जागा लढण्याच्या तयारीत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. शिंदे गटाचे ४८ आमदार असल्याने उरलेल्या सर्व जागांवर भाजपचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला खूप काम करावे लागणार असल्याचे आवाहन देखील बावनकुळे यांनी केले.

नेमकं याच विधानवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. दानवे यांनी बावनकुळे यांच्या विधानाचा दाखला देत ट्विट केले असून मिंधे गटाची हिच का किमंत? असा प्रश्न उपस्थितीत केला आहे. (Shivsena) शुक्रवारी (१७ मार्च) भाजप महाराष्ट्र सोशल मीडिया अभ्यास्वर्गास संबोधित करताना सर्वांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ५० हून अधिक जागा लढवण्यासाठी चांगले उमेदवार नाहीत. शिवाय भाजपला शिंदे गटासह इतर मित्रपक्ष आणि अपक्षांसाठीही काही जागा सोडाव्या लागतील. तर शिंदे गटाकडे ४० आमदार आणि काही अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांच्या जागा सोडल्या तर भाजप शिंदे गटासाठी जास्त जागा सोडणार नसल्याचे सांगितले होते.

यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतांना दानवे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. दानवे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, २०२४ विधानसभेत मिंधे गटाला ४८ जागा देण्याचे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचा प्लॅन जाहीर करून टाकला. 'बाळासाहेबांचा विचार' पुढे नेणाऱ्या बेगडी मिंधे गॅंगची हीच किंमत का मग? उचला अजून 'महाशक्ती'च्या पालख्या! आता कळलं असेल उद्धव साहेबांनी का लाथ मारली भाजप सोबतच्या युतीला ! असा टोला देखील दानवे यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT