Mahavikas Agahdi News : सभा आघाडीची, तयारी ठाकरेंच्या शिवसेनेची..

Shivsena : छत्रपती संभाजीगनर येथे २ एप्रिल रोजी आघाडीची संयुक्त सभा होणार आहे.
Mahavikas Aghadi News, Aurangabad
Mahavikas Aghadi News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत जनतेने दिलेला कौल हा राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या बाजूने नाही, तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बाजूने असल्याचे स्पष्ट झाले. ठाकरेंच्या शिवसेनेचे काय होणार याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात पुढच्या काही दिवसांत लागणार आहे. या दोन्ही घटना पाहता महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यासाठी मैदानात उतरली आहे.

Mahavikas Aghadi News, Aurangabad
Name Change Politics News : एमआयएमची माघार, सकल हिंदू मोर्चाच्या तयारीत..

मुंबईत आघाडीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक झाली. आता राज्यभरात होणाऱ्या संयुक्त जाहीर सभांसाठीची तयारी सुरू झाली आहे. (Shivsena) सभा महाविकास आघाडीच्या होणार असल्या तरी यासाठी पुढाकार हा ठाकरेंच्या शिवसेनेनेच घेतलल्याचे दिसून येत आहेत. (Marathwada) मुंबईत सगळ्या पक्षांचे नेते, पदाधिकारी एकत्र आले होते, इकडे सभेच्या तयारीसाठी होत असलेल्या आढावा बैठकांसाठी मात्र ठाकरे गटाचे नेते एकटेच झटत असल्याचे चित्र आहे.

छत्रपती संभाजीगनर येथे २ एप्रिल रोजी आघाडीची संयुक्त सभा होणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणारी ही सभा रेकाॅर्डब्रेक करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नेते चंद्रकांत खैरे, सचिव अशोक पटवर्धन यांनी दौरे सुरू केले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला शनिवार, रविवार सुटी असल्याने दानवे यांनी संपुर्ण जिल्ह्याचा दौरा करत आढावा सुरू केला आहे.

तर मराठवाडास्तरावरचा आढावा खैरे, पटवर्धन हे घेत आहे. २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता बीड जिल्ह्यातील पदाधिकारी यांची आढावा बैठक तर सायंकाळी ४ वाजता लातूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. तर मंगळवारी २१ मार्च रोजी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन व दुपारी १ वाजता धाराशिव येथे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत. शिवसेनेचे नेते या संयुक्त आघाडीसाठी मैदानात उतरले असले तरी राष्ट्रवादी, काॅंग्रेसच्या पातळीवर मात्र सध्या शांतता दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com