Vidhan Parisad : मुंबईमध्ये २०२२ च्या गणेशोत्सव काळात प्रभादेवी येथे एका आमदाराने आपल्या पिस्तुलमधून गोळी झाडली होती. (Ambadas Danve) त्याठिकाणी काही काडतुस देखील सापडले होते. परंतु ही काडतुस त्याच पिस्तुलमधील आहे की नाही हे शोधावे लागेल? असे सांगत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. आता बॅलेस्टिक अहवाल समोर आला आहे, त्यानूसार पिस्तुल आणि सापडलेले काडतुस हे सदर आमदारांचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावर आता पिस्तुल आणि काडतुस (Crime) जरी संबंधित आमदारांचे असले तरी गोळी त्यांनी झाडली होती का? याचा शोध घ्यावा लागेल, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २८९ अन्वये सभागृहात सांगितले. (Shivsena) सरकार या आमदाराला पाठिशी घालत आहे का? कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा प्रश्न महत्वाचा असल्याने यावर सरकारने सभागृहात उत्तर द्यावे, अशी मागणी देखील दानवे यांनी केली.
२८९ च्या सूचनेवर बोलतांना दानवे म्हणाले, मुंबईमध्ये २०२२ चा गणेशोत्सव झाला होता तेव्हा प्रभादेवीत एका आमदाराने गोळी झाडली होती. ज्या पिस्तुलातून गोळी झाडली गेली ते पोलिसांनी जप्त केले होते. जिथे ही घटना घडली तिथेच काही काडतुसे देखील पोलिसांना सापडली होती. ११ जानेवारी २०२३ मध्ये ज्या पिस्तुलमधून गोळी झाडली गेली ते रिव्हाॅल्वर त्याच आमदाराचे असल्याचे स्पष्ट झाले.
या संदर्भातील बॅलेस्टिक अहवाल प्राप्त झाला आहे, पण आता पोलिस म्हणतात, त्या आमदाराने त्या गोळ्या झाडलेल्या नाहीत. पिस्तुल, काडतुस त्याच आमदाराचे आहे हे स्पष्ट झाल्यावर गोळी मात्र त्यांनी झाडली नाही, असा दावा पोलिस कसा काय करु शकतात? रिव्हाॅल्वरचे लायसन्स सहसा कुणाला मिळत नाही. ते दुसऱ्या कुणाला देता येत नाही, सगळी माहिती पोलिसांना द्यावी लागते. मग पोलिस आता हे कसे म्हणू शकतात की ते रिव्हाॅल्वर, काडतूस आमदाराचे आहे, पण गोळी त्यांनी झाडलेली नाही.
सरकारची, पोलिसांची या बाबतची भूमिका काय? हे सुस्पष्ट केले पाहिजे. हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, यावर चर्चा झाली पाहिजे. सरकार त्या आमदाराला पाठीशी घालत आहे का? उपमुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर देणे आवश्यक आहे, अशी मागणी देखील दानवे यांनी केली. सभापती डाॅ. निलम गोऱ्हे यांनी देखील सरकाने निवेदन करावे, असे निर्देश दिले आहेत. प्रभादेवी परिसरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता.
त्यानंतर पुन्हा एकदा या दोन्ही गटात मध्यरात्री हाणामारी झाली. या प्रकऱणी २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले होते. तसेच, ठाकरे गटातील कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या राड्यावेळी शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आमदार सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.