Ambadas Danve-Dcm Fadanvis News
Ambadas Danve-Dcm Fadanvis News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Women Security : महिला असुरक्षित असल्याची गृहमंत्र्यांना जाणीवच नाही..

सरकारनामा ब्युरो

Shivsens : छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा भागात एका महिलेवर सामुहिक बलात्काराची घटना घडली होती. या गंभीर घटनेची दखल घेत पीडित महिलेच्या घरी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी नकुतीच भेट दिली. या घटनेतील मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबियांवर ओढावलेल्या दु:खात सहभागी होऊन त्यांचे सांत्वन केले.

हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी यावेळी त्यांनी राज्य सरकारकडे केली. राज्यातील महिला (Women) असुरक्षित आहेत, याची जाणीव राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना नाही, अशी टीका देखील त्यांनी केली.

अंबादास दानवे म्हणाले, सामुहिक बलात्काराची ही घटना चिंताजनक आणि मन हेलावणारी आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीवर राज्याच्या पोलीस आणि गृह विभागाचा वचक राहिलेला नाही, असे या घटनेवरून दिसून येते.

सदरील घटना निर्भया प्रकरणासारखीच गंभीर असून राज्यातील महिला असुरक्षित आहेत याची जाणीव राज्याच्या गृहमंत्र्यांना राहिलेली नाही. पीडित महिलेला तातडीने न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT