Imtiaz jalil Letter To PM News : इम्तियाज जलील यांना शोधायचंय दंगली मागचं सत्य..

Aimim : दंगलीचा ठपका आपल्यावर किंवा पक्षावर नको यासाठी इम्तियाज यांची धडपड सुरु आहे.
Mp Imtiaz Jalil News
Mp Imtiaz Jalil NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नुकतेच किराडपुरा दंगल प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पत्र पाठवले. निवृत्त न्यायमुर्तींकडून या दंगलीची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या दंगल प्रकरणाचा ठपका विरोधक इम्तियाज जलील यांच्यावर फोडत आहेत. भाजपचे राज्यसभेचे खासदार डाॅ. अनिल बोंडे यांनी तर या दंगली मागे राष्ट्रवादीचा एक स्थानिक नेता आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यातील वाद कारणीभूत असल्याचा आरोप केला होता.

Mp Imtiaz Jalil News
Thackeray Vs Shinde : ठाकरे करणार शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम? आखला 'हा' मास्टर प्लॅन

तर किराडपुऱ्यातील राम मंदिराचा बचाव केला असा दावा इम्तियाज यांच्याकडून केला गेला. यासाठी ते मंदिरात असतांना त्यांनी पोलिसांशी सांधलेला संवाद, दिलेल्या सूचना याचे व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आले आहेत. (Aimim) तर सकल हिंदू एकत्रिकरण समितीने मात्र इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्यावर ते मंदिर वाचवायला नाही, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी मंदिरात गेल्याच आरोप केला आहे.

किराडपुऱ्यातील दंगलीचे राजकीय फायदे उठवण्याचा दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू असतांना इम्तियाज यांनी थेट पंतप्रधानांनाच पत्र पाठवून या दंगलीच्या चौकशीची निवृत्त न्यायमुर्तीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत विरोधकांना चपराक दिली आहे. किराडपुऱ्यातील दंगलीने शहर आणि जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होणार आहे. ही दंगल घडवण्यात आली, पोलिसांची भूमिका संशयास्पद होती, असे आरोप इम्तियाज यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रात केले आहेत.

एकीकडे पोलिसांवर संशय तर दुसरीकडे विरोधकांकडून दंगलीबाबत खासदार इम्तियाज यांच्यावरच होत असलेले आरोप या पार्श्वभूमीवर त्यांनी `दूध का दूध, पाणी का पाणी`, करण्याची भूमिका घेतली आहे. आता इम्तियाज यांच्या पत्राची पंतप्रधान दखल घेतात का? दंगलीची चौकशी निवृत्त न्यायमुर्तींमार्फत करतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शहराच्या नामांतरानंतर श्रेय व विरोध करत दोन्ही बाजुंनी राजकारण केले गेले.सत्ताधाऱ्यांनी समर्थनात तर एमआयमने विरोधात मोर्चे काढत राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला.

पण या श्रेयवादाच्या लढाईतून शहराचे मात्र नुकसान झाल्याची भावना सामान्यांच्या मनामध्ये आहे. किराडपुरा येथील दंगलीचे दुरगामी परिणाम हे जिल्ह्यातील औद्योगिक विकास व राजकीय क्षेत्रात होणार आहेत. दंगलीचा ठपका आपल्यावर किंवा पक्षावर नको यासाठी इम्तियाज यांची धडपड सुरु आहे. शहरात दंगल झाली की हिंदू मतदार एकवटतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे. असे झाले तर इम्तियाज यांचे दुसऱ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न भंगणार आहे. परिणामी दंगलीमागचे सत्य शोधून काढण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दंगलीचा राजकीय लाभ कुणालाही होवो, पण या मागे कोण होते हे समोर यायलाच हवे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com