Assembly Session News : राज्यात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने लागू केला होता. त्याला राज्यभरातून विशेषत: मराठी जनतेकडून विरोध झाल्यानंतर महायुती सरकारने या सदंर्भातील जीआर मागे घेतला. एकीडकडे हिंदी भाषेचा आग्रह सरकार करते आहे, तर दुसरीकडे राज्यातील मराठी शाळांची अवस्था कशी बिकट झाली आहे, याचे वास्तव विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सभागृहात मांडत सरकारला धारेवर धरले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील दुरावस्था अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. ही आहे फुलंब्री तालुक्यातील कुदळेवस्ती येथील जिल्हा परिषद वस्तीशाळेची बिकट अवस्था. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना बाहेर बसून शिकण्याची वेळ या राज्यकर्त्यांनी आणली. अशा कित्येक महाराष्ट्रातील शाळेंची या सारखीच दुर्दैवी अवस्था आहे. शेवटी काय तर राज्य कंगाल होण्याच्या मार्गावर उभा ठाकलेला असताना शासनकर्ते घोषणामग्न झाले आहेत, अशी टीका दानवे यांनी केली.
न नीट वर्गखोल्या न बेंच..
हिंदी लादू पाहणाऱ्यांच्या काळात मराठीभाषा कशी टाचा घासते पहा, असे म्हणत अंबादास दानवे यांनी मराठवाड्यातील (Marahwada) धाराशीव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील 960 पटसंख्या असलेल्या शाळेत न नीट वर्गखोल्या आहेत न बसण्यासाठी बेंच. शाळेचा स्वतंत्र 7/12 नसल्याने दुरुस्ती करता येत नाही. महसूल प्रशासन शाळा पडण्याची वाट पाहत आहे का? विशेष म्हणजे या शाळेतील 9 विद्यार्थ्यांनी यंदा दहावीला 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहे.
शाळा मराठी आहे म्हणून वरिष्ठांच्या धाकाने स्थानिक भाजप आमदार, पालकमंत्री या शाळेकडे बघेनासे झाले आहेत का? असा सवाल दानवे यांनी सरकारला केला. हिंदीचा तबला वाजवून थोडी उसंत मिळाली असेल तर या मराठीच्या विद्यामंदिराकडे थोडं बघा, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला!
दरम्यान, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री आपल्या अधिकारांचा गैरवापर करून राज्यातील जमिनी बळकावत आहे. सत्ताधारी वारी सारख्या हिंदू धर्मातील पवित्र मार्गाला अर्बन नक्षल म्हणून विठुरायाला आणि वारकऱ्यांना बदनाम करत आहेत, असा आरोप करत विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांच्या या अपमानकारक जुलमशाही विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
घोटाळे बाज सरकारचा धिक्कार असो, शेतकरी उपाशी मंत्री तुपाशी. वारकऱ्यांना अर्बन नक्षल म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, भूखंड लाटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, वारीला बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो.. भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या भ्रष्ट मत्र्यांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.