Ambadas Danve On Farmers Issue: विना विलंब बिनशर्त शेतकर्‍यांचं पिक कर्ज मंजूर करा ! शिवसेनेकडून 'बँकांची शाळा' आंदोलन..

Shiv Sena Launches 'Bankanchi Shala' Protest Demanding Immediate Crop Loan Approval: सिबिल,थकबाकी वअन्य काही तांत्रिक बाबी दाखवून पिक कर्ज नाकारले जात आहे. या परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बँकांना जाब विचारण्यात आला.
Shivsena UBT For Farmers Loan Issue News
Shivsena UBT For Farmers Loan Issue NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळवून देण्यासाठी मराठवाडा स्तरावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आज 'बँकाची शाळा' घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची अग्रणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य शाखेत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी धडक देत शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारल्याचा जाब विचारला. विना विलंब व बीनशर्त शेतकऱ्यांचं पिक कर्ज मंजूर करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शेतकऱ्यांचे (Farmers) पीक कर्जाचे आलेले अर्ज किती, पीक कर्ज अर्ज मंजूर किती?, नामंजूर अर्ज किती?, प्रलंबित अर्ज व त्यांची कारणे काय ?, पीक कर्जाचे उद्दिष्टे किती आतापर्यंत पूर्ती किती ? सिबिल आणि थकबाकीमुळे किती शेतकऱ्यांचे पिक कर्जाचे अर्ज नाकारण्यात आले, याची माहिती बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.

सद्यस्थितीत शेतमालाला हमीभाव मिळत नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असून राज्य शासनाच्यावतीने पीक विम्याचे धरसोडीचे धोरण सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पुरेसे पीक कर्ज मिळण्याची आवश्यकता आहे. (Shivsena UBT) विना विलंब व बीनशर्त शेतकऱ्यांचं पिक कर्ज मंजूर करा, अशी मागणी करत बँकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Shivsena UBT For Farmers Loan Issue News
Farmer suicide : सावकार चारचौघांत अपमान करायची संधी सोडत नव्हता; कर्जबाजारी शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल

सिबिल,थकबाकी वअन्य काही तांत्रिक बाबी दाखवून पिक कर्ज नाकारले जात आहे. या परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बँकांना जाब विचारण्यासाठी 'बँकांची शाळा' या माध्यमातन आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आला. आपण शेतकऱ्यांचे पिक कर्ज त्वरित मंजूर करावे, कोणतेही तांत्रिक कारण दाखवून ते नाकारू नये, अशी मागणी करण्यात आली.

Shivsena UBT For Farmers Loan Issue News
Ambadas Danve On Farmers Issue : सरकारने बघ्याची भूमिका घेतली ; चार महिन्यात एक हजार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले!

शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या विरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा अंबादास दानवे यांनी यावेळी दिला. रखडलेल्या पिक कर्जाच्या फायली तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, अशा इशाराही यावेळी देण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com