Ambadas Danve Letter To CM News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : हॉटेल व्हिट्स लिलाव प्रक्रियेवर अंबादास दानवे यांचा आक्षेप! कुंपणच शेत खात असल्याचा महसूल प्रशासनावर आरोप

Ambadas Danve has accused the revenue administration of irregularities in the Chhatrapati Sambhajinagar hotel auction : छत्रपती संभाजीनगर शहरात रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या व्हिट्स हाॅटेल विक्रीसाठी महसूल प्रशासनाकडून लिलाव प्रक्रिया नुकतीच राबवण्यात आली.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : धनदा कार्पोरेशन लिमिटेड व हॉटेल VITS, छत्रपती संभाजीनगर या प्रकरणी महसूल प्रशासनामार्फत अत्यल्प मूल्यावर लिलाव प्रक्रिया रराबविण्यात आली असून लिलाव प्रक्रिया पूर्वनियोजित व विशिष्ट कंपनीस लाभ मिळावा या हेतूने राबविण्यात आल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. या संपूर्ण लिलाव प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या व्हिट्स हाॅटेल विक्रीसाठी महसूल प्रशासनाकडून लिलाव प्रक्रिया नुकतीच राबवण्यात आली. रेडीरेकनरच्या दरानूसार या हाॅटेलचे मूल्य 110 कोटी इतके निश्चित करण्यात आले. बाजार मूल्य त्यापेक्षा किती तरी अधिक असताना महसूल प्रशासनाने मात्र अल्प दारात हे हाॅटेल विक्री करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. या सदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र पाठवले आहे.

धनदा कार्पोरेशन लिमिटेड व हॉटेल VITS, छत्रपती संभाजीनगर या प्रकरणी महसूल प्रशासनामार्फत अत्यल्प मूल्यावर लिलाव प्रक्रिया रराबविण्यात आली असून लिलाव प्रक्रिया पूर्वनियोजित व विशिष्ट कंपनीस लाभ मिळावा या हेतूने राबविण्यात आलेली आहे. (Devendra Fadnavis) विशेषतः संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तपास यंत्रणांतील काही अधिकाऱ्यांनी भागधारकांतील विशिष्ट घटकांच्या दबावाखाली किंवा आर्थिक हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया राबवली आहे.

सदर हॉटेलच्या 2012 मध्ये करण्यात आलेल्या अधिकृत मूल्यांकन अहवालानुसार सदर मालमत्तेची किंमत 110 कोटी इतकी निश्चित करण्यात आली होती. महागाई निर्देशांक आणि स्थावर मालमत्तेच्या बाजारभावानुसार सद्य:स्थितीत सदर मालमत्तेचे मूल्य यापेक्षा कितीतरी अधिक आहे. मात्र, मालमत्तेची लिलाव प्रक्रिया केवळ अत्यल्प प्रमाणात केल्याने शासनाच्या महसुलाचे नुकसान झालेले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच, सदर मालमत्तेचे कोणतेही अंतिम हस्तांतरण होण्यापूर्वी संपूर्ण वस्तुस्थिती मा. सर्वोच्च न्यायालयासमोर विधिवतरीत्या सादर करण्यात यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे या पत्राद्वारे केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एका मंत्र्यांने हे हाॅटेल खेरदी केल्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. या हाॅटेल खरेदीच्या लिलावामध्ये तीन कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे. सर्वात जास्त मुल्याची निविदा मेसर्स सिद्धांत साहित्य खरेदी व पुरवठा कंपनीची प्राप्त झाली आहे. इतर दोन कंपन्यांनी कमी बोली लावल्याचे दानवे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT