ShivSena UBT leader Ambadas Danve staging a sit-in protest at the election officer’s office in Chhatrapati Sambhajinagar, demanding Mashal symbol allocation for party candidates. Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : मोठा संघर्ष टळला..! ऐन निवडणुकीत दानवेंचं ठिय्या आंदोलन, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल पेटली!

ShivSena UBT News : अंबादास दानवे यांच्या ठिय्या आंदोलनानंतर अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला मशाल चिन्ह मिळाले. ऐन निवडणुकीतील मोठा संघर्ष टळल्याची चर्चा आहे.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीतील चित्र आता स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी(ता.2) अर्ज माघारीनंतर सगळ्याच पक्षांमध्ये थोड्या-फार प्रमाणात बंडखोरी उफाळून आली. अपक्षांना चिन्हाचे वाटपही निवडणुक विभागाकडून करण्यात आले. आता प्रचाराचा धुराळा उडणार असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या विरोधात ठिय्या आंदोलन केल्यानंतर अखेर त्यांना मशाल चिन्ह देण्यात आले.

आमच्या उमेदवाराला मशाल चिन्ह वाटप केले नाही, तर निवडणुक निर्णय अधिकाऱ्याला उठू देणार नाही. निवडणूक राहील एकीकडे, आम्ही या अधिकाऱ्यांच्याविरोधात मोर्चा आणू, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला होता. अखेर मशाल चिन्ह दिल्याने ऐन निवडणुकीतील संघर्ष टळल्याचे बोलले जात आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 4 मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार सावित्रीबाई हिरालाल वाणी यांना उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही मशाल हे अधिकृत निवडणूक चिन्ह देण्यात आले नव्हते.

या गंभीर प्रकाराविरोधात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे हे निवडणूक यंत्रणेचे घटनात्मक कर्तव्य असताना, जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मशाल चिन्ह न मिळाल्यामुळे उमेदवाराच्या प्रचार प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून हा प्रकार लोकशाही मूल्यांवर तसेच न्यायालयाच्या आदेशावर गंभीर आघात करणारा असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणाची दखल घेत अंबादास दानवे यांनी राज्य मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे तसेच मनपा आयुक्त तथा महानगरपालिका निवडणूक अधिकारी यांच्याशी थेट फोनवरून संवाद साधला. उच्च न्यायालयाचा आदेश असूनही उमेदवाराला चिन्ह न दिले जाणे हे अत्यंत गंभीर असून तात्काळ आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली.

उच्च न्यायालयाचा आदेश डावलण्याचा अधिकार कोणालाही नाही. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि कायद्याच्या चौकटीतच पार पडली पाहिजे. अन्यथा शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंदोलन करेल, असा इशारा दानवे यांनी यावेळी दिला. या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, न्यायालयीन आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून उमेदवार सावित्रीबाई हिरालाल वाणी यांना मशाल चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी करत अंबादास दानवे शिवसैनिकांसह निवडणुक कार्यालयात ठाण मांडून बसल्यानंतर अखेर त्यांना मशाल चिन्ह देण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT