Shivsena Leader Ambadas Danve News Shivsena Leader Ambadas Danve News
मराठवाडा

Vidhansabha Election 2024 : अंबादास दानवेंनी `तो` फोटो पोस्ट करत महायुतीला दिला इशारा

Ambadas Danve warned Mahayuti by posting ``that'' photo : काळे जॅकेट आणि पांढरा शर्ट घातलेले या फोटोतील नेते आता गेले दोन वर्षांतील घटनाबाह्य सरकारच्या काळातील जंत्री आपल्यापुढे वाचतील. मात्र यांनी पाच वर्षांपूर्वी केलेला हा पहाटेचा शपथविधी फक्त लक्षात ठेवावा.

Jagdish Pansare

Shivsena Leader Ambadas Danve News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा आणि आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुक, 20 नोव्हेंबरला मतदान 23 ला निकाल असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख जाहीर केल्यानंतर आता राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत.

शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे झालेल्या शपथविधीचा फोटो पोस्ट करत महाविकास आघाडीला डिवचले आहे. हा फोटो आठवतोय ना? या पहाटेच्या शपथविधीची तारीख होती 23 नोव्हेंबर 2019. आता 23 नोव्हेंबर 2024 रोजीच महाराष्ट्राची जनता आणि महाविकास आघाडी यांचा निकाल लावणार आहे !

काळे जॅकेट आणि पांढरा शर्ट घातलेले या फोटोतील नेते आता गेले दोन वर्षांतील घटनाबाह्य सरकारच्या काळातील जंत्री आपल्यापुढे वाचतील. मात्र यांनी पाच वर्षांपूर्वी केलेला हा पहाटेचा शपथविधी फक्त लक्षात ठेवावा. बाकी विजय आपलाच आहे !, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी महायुती सरकारला इशारा दिला आहे.

रणांगण सजलं आहे ! आता वेळ जीव ओतून लढत देण्याची. पक्षाफोडी करून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा आलेख रसातळाला पोचवणाऱ्यांना सत्तेबाहेर करण्याची, असे सांगतानाच लढेल महाविकास आघाडी! जिंकेल महाराष्ट्र, असा विश्वास अंबादास दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर भाजपने शिवसेना पक्षही फोडला. (Shivsena) एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदारांनी भाजपच्या मदतीने सत्ता आणि मुख्यमंत्री पद मिळवले. गेल्या सव्वादोन वर्षाहून अधिक काळापासून अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून महायुती सरकारवर तुटून पडले होते.

आता प्रत्यक्षात निवडणूक जाहीर झाल्यानंतर लोकसभेप्रमाणे महाराष्ट्राचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने जातो, की मग महायुती सत्ता राखण्यात यशस्वी ठरते? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मात्र पहाटेच्या शपथविधीचा विसर महाराष्ट्रातील जनतेला पडू नये, याची काळजी हा फोटो पोस्ट करत केल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT