Ambadas Danve News : हजारो महिला बेपत्ता अन् सरकार पंधराशे रुपये देऊन पाठ थोपटून घेतयं

After hearing your Shinde-Fadnavis-Pawar speech, people have decided to send you home : मराठवाड्याचा दुष्काळ इतिहासजमा करू असे जुनेच आश्वासन दिले गेले! आता खरं तर जेवढ्या जुन्या कृष्णा-गोदा या महाराष्ट्राच्या नद्या आहेत, तेवढेच जुने हे आश्वासन झाल्याचे लोकांना कळून चुकले आहे.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena v/s Mahayuti Political News : `मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण` योजनेचा मेळावा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरात पार पडला. महाविकास आघाडीचा `सावत्र भाऊ` असा उल्लेख करत तीनही नेत्यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्यावरून शिंदे-फडणवीस-पवार यांना टोला लगावला आहे.

राज्यातील 26 हजार महिला बेपत्ता आहेत, महिला सुरक्षेचा बोजवारा उडालेला असतांना पंधराशे रुपये खात्यात टाकून स्वतःची पाठ थोपटवून घेणे निर्लजपणाचा कळस असल्याचे दानवे (Ambadas Danve) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आज एका अर्थाने युतीची प्रचार सभाच झाली. तीन सत्ताधारी पक्षांची निवडणूक चिन्हे लोकांच्या मनातून पुसली गेली असल्यानेच आज घसा कोरडा करून ती लोकांना सांगावी लागली.

मराठवाड्याचा दुष्काळ इतिहासजमा करू असे जुनेच आश्वासन दिले गेले! आता खरं तर जेवढ्या जुन्या कृष्णा-गोदा या महाराष्ट्राच्या नद्या आहेत, तेवढेच जुने हे आश्वासन झाल्याचे लोकांना कळून चुकले आहे. संभाजीनगर शहराच्या पाणी पुरवठा योजनेला यांनी 'तारीख पे तारीख' योजना म्हणून घोषित करायला हवे.

Ambadas Danve News
Ambadas Danve News : `लाडकी बहीण` कार्यक्रमाला प्रत्येकी पन्नास महिला आणण्याचे टार्गेट ; दानवेंचा पुराव्यासह आरोप

मराठवाडा वॉटर ग्रीडचे आश्वासन पुन्हा देता यावे, यासाठी तुटपुंजी रक्कम देऊन या योजनेचा कागदोपत्री आराखडा तयार करण्यास तोकडी रक्कम मान्य केली. (Eknath Shinde) पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचेच आहेत, मनात नसले तरी तुमच्या कामाचे कौतुक करतात. अहो महाराष्ट्रातून गेल्या आठ महिन्यांत तब्बल 26 हजार महिला बेपत्ता झाल्या आहेत.

महिला सुरक्षेचा बोजवारा उडालेला असताना 1500 रुपये खात्यात टाकून आपलीच पाठ थोपटून घेणे हा निर्लज्जपणाचा कळस आहे!कांदा, कापूस, सोयबीनला मदत देण्याचे ढोंग हे केवळ लोकसभेच्या पराभवावर पांघरूण घालण्यासाठी लढवलेली शक्कल असल्याची टीका दानवे यांनी केली.

Ambadas Danve News
Eknath Shinde News : सरकारची ताकद वाढवा, तुम्हाला देतांना हात आखडता घेणार नाही

शेती, आरक्षणाचे आंदोलन, दुष्काळ, शेती या सगळ्या आघाड्यांवर नापास सरकारला घरी पाठवण्याचा निर्धार आज लोकांनी ही भाषणे ऐकून केलेला आहे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,अजित पवारजी असा टोलाही अंबादास दानवे यांनी महायुतीला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.