Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Loksabha Election : 'भुमरे दंड थोपटू की...' ; दानवे कडाडले!

Mayur Ratnaparkhe

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीवरून स्थानिक नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

ठाकरे गटातील नेते आणि संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danve) या दोघांनीही लोकसभा निवडणुकीसाठी दंड थोपटलेले आहेत. तर आता शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांनीही यामध्ये उडी घेतली आहे. यावरून अंबादास दानवेंनी त्यांना टोला लगावला आहे.

अंबादास दानवे म्हणाले, 'मला असं वाटतं की संदीपान भुमरे(Sandipan Bhumre) हे काही या मतदारसंघातील नाहीत. त्यामुळे त्यांनी कितीही दंड थोपटले किंवा आणखी काही केलं तरी त्यांचा या कुस्तीशी संबंध येणार नाही. त्यांनी या गोष्टीवर बोलण्याची आवश्यकता नाही.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचबरोबर 'मागील 30-40 वर्षापासून संदिपान भुमरेंची एकच अपेक्षा आहे की सगळं स्वत:लाच मिळावं, आपल्या भावाला मिळावं आणि मुलालाही मिळावं.' असा जोरदार हल्लाबोल दानवे यांनी संदिपान भुमरेंवर केला आहे.

दानवे आणि खैरेंमधील वाद सुरूच राहील, असं भुमरे म्हणाले आहेत. यावर बोलताना दानवेंनी सांगितलं की, 'चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) हे माझे नेते आहेत. त्यामुळे माध्यमांमध्ये जर एखादी बातमी येत असेल तर तो काय वाद नसतो. त्यामुळे खैरे आणि माझ्यात वाद आहे असं काही म्हणणं चुकीचं आहे.'

'शिवसैनिक हे भांडत असतात आणि वेळ पडली की पुन्हा एकत्र येत असतात. संघटनेमध्ये काम करत असताना अशा चर्चा होतच असतात आणि या चर्चेतूनच पुढचा मार्ग निघत असतो. त्यामुळे माझ्याही मनात काही शंका नसून खैरे यांच्याही मनात काही शंका नाही.' असं बोलून राजकीय वर्तुळात उलट सुलट होणाऱ्या चर्चेला एक प्रकारे पूर्णविराम दिला आहे.

गिरीश महाजनांना टोला -

राम मंदिर निमंत्रणावरून गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंचा व्हीव्हीआयपींच्या यादीत समावेश नसल्याचं सांगतिलं होतं. यावर प्रतिक्रिया विचारली असता, गिरीश महाजन हे सुद्धा काही मोठे व्हीआयपी नेते नाहीत. त्यामुळे महाजनांवरती अधिकच बोलणं मी टाळेल. असं दानवेंनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT