Chhatrapati Sambhajinagar News : शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी आगामी मंत्रिमंडळ विस्तारात ‘आपल्याला शंभर टक्के मंत्रिपद मिळेल’ असा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बांगर यांना जोरदार चिमटा काढत मूळ मुद्यालाच हात घातला आहे. (Ambadas Danve's reaction to Santosh Bangar's ministerial claim)
संतोष बांगर (mla Santosh Bangar) यांना मंत्रिपद मिळालं, तर या महाराष्ट्रात (Maharashtra) मटक्याला राजकीय मान्यता मिळेल. महाराष्ट्र सरकारची अधिकृत मान्यता मिळेल. त्याची वाट महाराष्ट्र पाहतो की काय, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बघावं, असा टोला विधान परिषदेतील शिवसेनेचे विरोधी पक्षनेते दानवे यांनी बांगर यांना लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत भाजप श्रेष्ठींना भेटून आले आहेत. तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांच्यापुढे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी काही अटी ठेवल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रखडला होता. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. ते कोणाची भेट घेतात आणि मंत्रिमंडळ विस्ताराची काही बातमी येते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. राज्य विस्ताराबरोबच दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू आहे. त्यात शिंदे गटातील दोन खासदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्रिमडळातील फेरबदलाबरोबरच राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारास दिल्लीत भाजप हायकमांडकडूनही हिरवा कंदिला मिळतो का, हे पाहावे लागेल. एकीकडे ही चर्चा सुरू असताना इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. शिंदे गटातील अनेकांनी अगोदरच इच्छा व्यक्त केलेली आहे. अनेकजण गुडघ्याला बांशिंग बांधून बसलेले आहेत, त्यात संतोष बांगर यांचाही समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.