Deputy President Dinesh Bharadia with municipal officials and members after his unopposed selection in Ambajogai Municipality during the first general body meeting. Sarkarnama
मराठवाडा

Ambajogai NagarPalika News : राजकिशोर मोदींची अंबाजोगाई नगरपालिकेत दमदार एन्ट्री : मुंदडांना आता सभागृहातच नडणार!

Dinesh Bharadia : अंबाजोगाई नगरपालिकेत लोकविकास महाआघाडीचे दिनेश भराडिया उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवडले गेले असून तीन स्वीकृत सदस्यांचीही बिनविरोध निवड जाहीर झाली आहे.

Jagdish Pansare

Beed Politics News : अंबाजोगाई नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी लोकविकास महाआघाडीचे दिनेश भराडिया यांची बिनविरोध निवड झाली. आज (गुरुवार, 15 जानेवारी) नगराध्यक्ष तथा पीठासन अधिकारी नंदकिशोर मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली.

या निवडीसोबतच रिक्त असलेल्या 3 स्वीकृत सदस्यपदांवर नगराध्यक्षपदावर पराभूत झालेले राजकिशोर मोदी, बबन लोमटे आणि संजय गंभीरे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी केवळ दिनेश भराडिया यांचाच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही प्रक्रिया बिनविरोध पार पडली.

स्वीकृत सदस्यपदासाठी लोकविकास महाआघाडीकडे 20 सदस्यांचे प्रबळ संख्याबळ असल्याने त्यांच्या वाट्याला दोन जागा आल्या, तर परिवर्तन जनविकास आघाडीला एक जागा मिळाली. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मधील कलम 9-अ (1) च्या तरतुदींनुसार या स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. या महत्त्वपूर्ण बैठकीस मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांच्यासह पालिकेचे सर्व 31 सदस्य व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

दोन पती-पत्नी जोडीची एन्ट्री

अंबाजोगाई नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दाम्पत्य (पती-पत्नी) एकाच वेळी सभागृहाचे सदस्य म्हणून शहर विकासाचा गाडा हाकणार आहेत. नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या दीपा बबन लोमटे आणि शिल्पा संजय गंभीरे या आधीच सभागृहात होत्या. आता त्यांचे पती अनुक्रमे बबन लोमटे व संजय गंभीरे यांची स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागल्याने, हे दोन्ही दाम्पत्य आता सभागृहाच्या कामकाजात अधिकृतपणे सहभाग घेतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT