Beed Municipal Corporation News : बीडमध्ये क्षीरसागरांचे मनोमिलन अशक्य, उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसलाच

Beed Municipal Corporation News : बीड महानगरपालिकेत राजकीय मनोमिलन अयशस्वी ठरले असून उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिले आहे.
Beed Municipal Corporation News
Beed Municipal Corporation NewsSarkarnama
Published on
Updated on

NCP News : बीड नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्ता मिळवल्यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठी आमदार संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर हे दोन चुलत भाऊ एकत्र येतील, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. नगरपालिका क्षीरसागरमुक्त झाल्याचा दावा करणाऱ्या विरोधकांना सुनावताना भाजपच्या गटनेत्या सारिका क्षीरसागर यांनी ' आमचे आणि माझे दीर यांचे नगरसेवक निवडून आले आहेत, आम्ही एकच आहोत, मग नगरपालिका क्षीरसागरमुक्त कशी झाली'? असा सवाल केला होता.

सारिका क्षीरसागर यांच्या या विधानानंतर बीड नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष पद आणि विषय समिती निवडीत दोन भाऊ एकत्र येणार, अशी चर्चा होती. परंतु आता ही शक्यता मावळली आहे, क्षीरसागरांमध्ये मनोमिलन नाहीच, हे स्पष्ट झाल्यामुळे नगरपालिकेत उपनगराध्यक्षही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच होणार असे निश्चित मानले जात आहे. बीड नगर पालिकेवरील 40 वर्षांची राजकीय हुकूमत मोडीचा पहिला टप्पा नगराध्यक्षपद निवडीनंतर स्पष्ट झाला.

उपनगराध्यक्ष निवडीवेळी दोन्ही क्षीरसागर एक होत हुकूमतीवर घाव घालणाऱ्या पंडितांना 'चेकमेट' देतील असे राजकीय अंदाज बांधले जात होते. मात्र, विद्यमान राजकीय परिस्थिती आणि घडामोडी पाहता दोन्ही क्षीरसागर एकत्रीकरण अवघड असल्याचे दिसते. त्यामुळे अपसुक राष्ट्रवादी काँग्रेसलाच उपनगराध्यक्ष मिळण्याची चिन्हे आहेत. 1985 पासून बीड नगर पालिकेवर क्षीरसागरांचे प्रभुत्व आहे. या कालावधीत सर्वाधिक काळ डॉ. भारतभूषण क्षीरसागर स्वत: नगराध्यक्ष राहीले. तर, काही वेळा त्यांच्या मर्जीने बीडचा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ठरत.

1991 साली अपात्रतेमुळे डॉ. क्षीरसागर रिंगणाबाहेर असल्याने दोन वर्षांसाठी शिवसेना - भाजप युतीने सत्ता मिळविली. मात्र, पुन्हा डॉ. क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालीच नगर पालिकेवर झेंडा फडकला. मागच्या निवडणुकीवेळी क्षीरसागरांच्या घरात फुट पडल्यानंतरही ते स्वत: नगराध्यक्ष व पुतणे उपनगराध्यक्ष झाले. या निवडणुकीने राजकीय समिकरणे बदलली. नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली.

Beed Municipal Corporation News
HSRP Number Plate : तुमच्या गाडीवर अजूनही HSRP नाही? आजपासून दंड की जप्ती? RTOने सांगितलं...

ऐनवेळी आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेची धुरा आली. तर, डॉ. क्षीरसागर यांनी भाजपचे नेतृत्व केले. तर, आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेतृत्व केले. दरम्यान, आता निकालात राष्ट्रवादीने बाजी मारली. नगराध्यक्षपदी प्रेमलता पारवे विजयी झाल्या. तर, पक्षाचे 19 नगरसेवक विजयी झाले. यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस व एमआयएम अशी 24 नगरसेवकांची शिव - फुले - शाहू - आंबेडकर बीड शहर विकास आघाडीची स्थापना झाली असून गटनेतेपदी फारुक पटेल यांची निवड झाली.

तर, दुसरीकडे भाजपचे 15 नगरसेवक विजयी झाले असून या गटाच्या नेतेपदी डॉ. सारिका क्षीरसागर यांची निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रसे शरदचंद्र पवार पक्षानेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांना सोबत घेत 13 नगरसेवकांची शहर विकास आघाडी स्थापन केली आहे. दरम्यान, पंडितांच्या नेतृत्वाखाली प्रथमच क्षीरसागरांविना नगराध्यक्ष झाल्याने आता उपगनगराध्यक्षपदासाठी दोन्ही भावंडे एकत्र येतील, असे राजकीय अंदाज बीडच्या वर्तुळात व्यक्त होत आहेत.

Beed Municipal Corporation News
Jury System in India : 'तो ऐतिहासिक खटला...' याचनंतर भारतातील ज्युरी पद्धत कायमीच बंद झाली!

मात्र, अलिकडेच संदीप क्षीरसागर यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वाढलेल्या चकरा पाहता ते भाजपला पाठींबा देणे अगदीच अशक्य मानले जात आहे. दुसरीकडे पंडितांचे किमान निम्मे मनसुबे धुळीस मिळविण्यासाठी आणि 'क्षीरसागरमुक्ती'चा नारा खोटा ठरविण्यासाठी डॉ. योगेश क्षीरसागरांकडून संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला बाहेरुन पाठींबा दिला जाईल, त्यामुळे शहरातील दोन्ही क्षीरसागरांच्या समर्थक मतदारांत चांगला मेसेज जाईल, अशी शक्यताही व्यक्त केली जात होती.

यासाठी मोठे राजकीय धाडस आवश्‍यक आहे. त्यामुळे ही शक्यताही अगदीच धुसर आहे. तर, राज्याच्या युतीच्या फॉर्म्युल्यानुसार भाजपला सत्तेत घेण्याचे वरिष्ठ पातळीवरुन काहीसे प्रयत्न झाले. पण, स्थानिक पातळीवर आम्ही विरोधात लढल्यामुळे आमच्यासोबत 'ते' नको, असा सुर राष्ट्रवादी काँग्रेसने लावला आहे. त्यातच संदीप क्षीरसागर यांच्याकडून राष्ट्रवादीला पाठींब्याच्या बळावर उपनगराध्यक्षपदाची मागणी झाली तरी त्यालाही स्थानिक राष्ट्रवादीया नेतृत्वाचा नकार आहे.

त्यामुळे दोन्ही पैकी एका क्षीरसागरांकडे उपनगराध्यक्ष अवघड आहे. संदीप क्षीरसागर भाजपला पाठींबा देऊ शकत नाहीत आणि राष्ट्रवादी त्यांचा पाठींबा नको म्हणतेय, म्हणजे त्यांना तटस्थ भूमिका घ्यावी लागू शकते. त्यामुळे येनकेन प्रकारे उपगनगराध्यक्षपदाची माळही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्याच गळ्यात पडेल, असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com