Ambajogai Municipal Council Election 2025 News Sarkarnama
मराठवाडा

Beed News : अस काय घडलं बीडमध्ये? या नगर पालिकेत भाजपचे कमळ- घड्याळाचे चिन्हच गायब अन् दोन्ही राष्ट्रवादी एकत्र!

Ambajogai Municipal Council Election : अंबाजोगाई नगर पालिकेवर राजकिशोर मोदी यांची 25 वर्षांपासून सत्ता आहे. 15 वर्षे ते स्वत: तर 10 वर्षे त्यांच्या भावजय नगराध्यक्ष होत्या.

Datta Deshmukh

  1. अंबाजोगाई नगरपालिकेत राजकिशोर मोदी आणि नंदकिशोर मुंदडा यांनी पक्ष आणि चिन्हाला दुय्यम मानत स्थानिक आघाडीला प्राधान्य देणारा वेगळाच पॅटर्न अवलंबला आहे.

  2. या रणनीतीमुळे नगरपालिकेचे राजकारण अधिक स्थानिक समीकरणांवर आधारित होत असून पारंपरिक पक्षराजकारणाला मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

  3. या निर्णयामुळे अंबाजोगाईतील निवडणूक-समिकरणांमध्ये नवीन बदल दिसत असून विरोधी गटांमध्ये चांगलाच खळबळ माजली आहे.

Local Body Election 2025 : बीड जिल्ह्यातील सहा नगर पालिकांच्या निवडणुकीची प्रक्रीया सुरु असून सोमवारी उमेदवारी अर्ज आणि सोबत पक्षांचे एबी फॉर्म दाखल करण्याची मुदत संपली. मात्र, महायुतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असलेल्या शहरात आणि या मतदार संघाचे आमदार भाजपचे असतानाही या नगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे कमळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्हच नाही. विशेष म्हणजे येथील निवडणुक महायुतीतीमधीलच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या दोन मातब्बर नेत्यांमध्ये होत आहे.

अंबाजोगाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकिशोर मोदी आणि भाजपचे नंदकिशोर मुंदडा रिंगणात उतरले असले तरी दोघांनीही आघाड्याचा पर्याय निवडला आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे या नगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र आले आहेत. बीड जिल्ह्यात बीडसह अंबाजोगाई, परळी, धारुर, माजलगाव आणि गेवराई या सहा नगर पालिकांच्या निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया संपली.

परळीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली आहे. तर, माजलगाव, धारुर, बीड आणि गेवराईत हेच दोन्ही मित्रपक्ष आमने सामने आहेत. अंबाजोगाईतही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे नेते नगराध्यक्षपदासाठी आमने - सामने असले तरी दोघांनीही आपापल्या पक्षांचे चिन्ह बाजूला ठेवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष राजकीशोर मोदी यांनी महाविकास आघाडी केली असून भाजपच्या नंदकिशोर मुंदडा यांनी परिवर्तन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अंबाजोगाई नगर पालिकेवर राजकिशोर मोदी यांची 25 वर्षांपासून सत्ता आहे. 15 वर्षे ते स्वत: तर 10 वर्षे त्यांच्या भावजय नगराध्यक्ष होत्या. सुरुवातीला काँग्रेसमध्ये असलेले राजकिशोर मोदी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार व अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष पृथवीराज साठे यांना सोबत घेण्यासाठी आघाडीचा पर्याय निवडला आहे.

तर, दुसरीकडे भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यावेळी खुद्द रिंगणात उतरले असले तरी त्यांनीही मुस्लिम मतांची बेगमी जुळविण्यासाठी चिन्ह दुर केले आहे. त्यांच्या पत्नी दिवंगत डॉ. विमल पाच वेळा आमदार तर सुन नमिता मुंदडा दुसऱ्यांदा आमदार आहेत. आमदार मुंदडांच्या विजयात नंदकिशोर मुंदडा यांचा कायमच मोठा वाटा राहीलेला आहे.

दरम्यान, अंबाजोगाईत मोदी - मुंदडा एकमेकांचे कट्टर राजकिय विरोधक मानले जातात. मात्र, आता या दोघांनीही विजयाचे गणित जुळवण्यासाठी आपापल्या पक्षांचे चिन्ह बाजूला ठेवले आहे. दोघांच्याही पक्षांनी त्यांना आघाड्यांना मान्यता दिल्याने या नेत्यांवरील पक्षाचा विश्‍वासही यातून दिसतो.

FAQs

1. राजकिशोर मोदी आणि नंदकिशोर मुंदडा पक्षाचा त्याग का करत आहेत?
स्थानिक समीकरणे मजबूत ठेवण्यासाठी आणि जास्तीत जास्त उमेदवारांना एकत्र करण्यासाठी त्यांनी स्थानिक आघाडीला प्राधान्य दिले आहे.

2. यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार?
मुख्य पक्षांची पकड कमी होण्याची शक्यता असून निवडणुकीत स्थानिक गटांकडे वळणारे मतदाते वाढू शकतात.

3. पक्षांनी या भूमिकेवर काय प्रतिक्रिया दिली आहे?
अधिकृत प्रतिक्रिया नसली तरी पक्षांतर्गत नाराजी आणि गोंधळ वाढल्याची चर्चा आहे.

4. स्थानिक आघाडीची ताकद किती आहे?
अंबाजोगाईत काही वॉर्डमध्ये त्यांचा मजबूत जनाधार असल्यामुळे ही रणनीती त्यांना फायदेशीर ठरू शकते.

5. या पॅटर्नचा भविष्यकाळातील राजकारणावर कसा परिणाम होईल?
इतर शहरांतही ‘पक्षाऐवजी स्थानिक आघाडी’ असा ट्रेंड दिसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT