Pankaja Munde News : पंकजा मुंडेंनी चांगलेच वातावरण जमविले; नगराध्यक्षपदाचे उमेदवार गोपीनाथ गडावर नतमस्तक!

Pankaja Munde And Mayor Candidate On Gopinath Gad :मुंडेंनी देखील सर्वांना शुभेच्छा देत नगरपरिषद निवडणूकीत सर्व जागांवर संपूर्ण ताकदीनिशी विजयश्री खेचून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
Pankaja Munde With Mayor Candidate On Gopinath Gad News
Pankaja Munde With Mayor Candidate On Gopinath Gad NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पंकजा मुंडेंनी बीडमध्ये निवडणूकपूर्व वातावरणनिर्मिती करण्यात मोठे यश मिळवले असून त्याचा थेट परिणाम नगराध्यक्ष पदाच्या इच्छुकांवर दिसून आला.

  2. अनेक उमेदवारांनी गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले, ज्यामुळे मुंडे कुटुंबाचा बीडमध्ये असलेला राजकीय प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

  3. नगराध्यक्ष पदासाठी पक्षांतर्गत हालचाली वेगवान झाल्या असून गडाच्या भेटींमुळे बीड पालिकेच्या समीकरणाला वेगळी दिशा मिळत असल्याची चर्चा सुरू आहे.

Beed Local Body Election : भाजपच्या दोन पैकी केवळ एका आमदारांच्या मतदार संघात निवडणुक. उर्वरित पाच नगर पालिका मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्यांच्या मतदार संघातील नगर पालिकांत. तरीही पंकजा मुंडे यांनी सकारात्मक डावपेच खेळत वातावरण जमविले आणि परळी वगळता इतर ठिकाणी मित्रपक्षच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात तगडे पॅनल आणि त्याच ताकदीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रिंगणात उतरविले.

अंबाजोगाईतून नंदकिशोर मुंदडा (परिवर्तन आघाडी), बीडमधून डाॅ. ज्योती घुंबरे, गेवराईतून गीता पवार, धारुरमधून रामचंद्र निर्मळ व माजलगावमधून डॉ. संध्या मेंडके उमेदवार आहेत. सोमवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतर या सर्वच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत गोपीनाथ गडावर जाऊन दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी निवडणूकीत संधी दिल्याबद्दल या उमेदवारांनी पंकजा मुंडे यांचे आभार मानले.

तर, मुंडेंनी देखील सर्वांना शुभेच्छा देत नगरपरिषद निवडणूकीत सर्व जागांवर संपूर्ण ताकदीनिशी विजयश्री खेचून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीत धनंजय मुंडे यांना परळी सुटल्याने खुद्द पंकजा मुंडे यांना उमेदवारी नव्हती. दोन जागा भाजपने लढविल्या आणि चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस लढली. यात भाजपकडून केजमधून नमिता मुंदडा आणि आष्टीतून सुरेश धस विजयी झाले. तर, राष्ट्रवादीतून परळीतून धनंजय मुंडे, माजलगावमधून प्रकाश सोळंके, गेवराईतून विजयसिंह पंडित विजयी झाले.

Pankaja Munde With Mayor Candidate On Gopinath Gad News
Pankaja Munde : चांगल्या-वाईट काळात माझ्यावर प्रेम केलंत त्याबद्दल परळीकरांनो थँक्यू ! पंकजा मुंडे गहिवरल्या

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून संदीप क्षीरसागर विजयी झाले. दरम्यान, आता होत असलेल्या नगर पालिका निवडणुका बहुतांश भाजपचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या मतदार संघातील आहेत. यात माजलगावधील माजलगाव व धारुर, गेवराई मतदार संघातील गेवराई तसेच परळीतील परळी आणि बीडमधील बीड व केज मतदार संघातील अंबाजोगाई नगर पालिकेचा समावेश आहे. यातील केवळ अंबाजोगाईत भाजपचे आमदार आहेत.

Pankaja Munde With Mayor Candidate On Gopinath Gad News
Beed News : बीडमध्ये सामाजिक गणित मांडत नगराध्यक्षपदांच्या उमेदवाऱ्या! चुरस वाढली

त्यामुळे निवडणुकीपूर्वी या सर्वच शहरांत भाजपला फारसे अनुकुल वातावरण नव्हते. मात्र, सुरुवातीला गेवराईतून बाळराजे पवार सक्रीय झाले आणि पंकजा मुंडेंसोबत गेले. त्यांच्या सोबतीला मुंडेंनी माजी मंत्री बदामराव पंडित यांना घेतले. त्या ठिकाणी त्यांनी पवारांच्या घरातील गीता पवार यांना उमेदवारी दिली. माजलगावमधूनही त्यांनी उच्चशिक्षीत उमेदवार दिला आहे. धारुरला नुकताच प्रवेश केलेल्या माधव निर्मळांचे नातेवाईक उमेदवार आहेत.

बीडमध्ये शेवटच्या क्षणी डॉ. योगेश क्षीरसागरांना पक्षात घेतले आणि उच्चशिक्षीत डॉ. ज्योती घुंबरे रिंगणात उतरविल्या. अंबाजोगाईसाठी आमदार मुंदडांचे सासरे रिंगणात उतरविले आणि तेथील समिकरणानुसार त्यांना भाजपऐवजी आघाडीसाठी परवानगी दिली. बीडमध्ये देखील शेवटच्या टप्प्यात पंकजा मुंडे यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आपल्याकडे आणले आणि कधी नव्हे ते बीडमध्ये भाजपचे नगरसेवक पदाचे 52 उमेदवार रिंगणात उतरले आणि नगराध्यक्षपदासाठी देखील डॉ. ज्योती घुंबरे या उच्चशिक्षित उमेदवार पक्षाने दिला.

या सर्व ठिकाणी भाजपची लढत मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अशी तिरंगी लढत होत आहे. परळीत मात्र त्यांनी कौशल्यपूर्ण डाव खेळत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीचे धोरण स्विकारले आहे. एकूणच शेवटच्या टप्प्यात पंकजा मुंडे यांनी केलेल्या बांधणीमुळे भाजप ताकदीने रिंगणात दिसत आहे. दरम्यान, या बांधणीत पक्षासाठी समन्वय, तांत्रिक प्रक्रीयेत जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांचा मोलाचा हातभारही महत्वाचा दुवा ठरला आहे.

FAQs

1. नगराध्यक्ष उमेदवारांनी गोपीनाथ गडावर का भेट दिली?
उमेदवारीपूर्वी आशीर्वाद घेण्याची परंपरा आणि पंकजा मुंडेंच्या प्रभावाची नोंद म्हणून उमेदवारांनी दर्शन घेतले.

2. पंकजा मुंडेंचा बीडच्या निवडणुकीवर किती प्रभाव असतो?
मुंडे कुटुंबाचा बीड जिल्ह्यात मजबूत जनाधार असून त्यांच्या संकेतांवर अनेक उमेदवार राजकीय रणनीती ठरवतात.

3. या भेटीमुळे कोणत्या पक्षाला अधिक फायदा होऊ शकतो?
मुख्यतः भाजपला फायदा होण्याची शक्यता असून अन्य पक्षांनाही या भेटीचे राजकीय परिणाम जाणवू शकतात.

4. गोपीनाथ गडाचे राजकारणात महत्व काय?
हे मुंडे कुटुंबाचे राजकीय व आत्मिक केंद्र असून राजकीय निर्णय, सभा आणि शक्तीप्रदर्शनाचे ठिकाण मानले जाते.

5. या वातावरणनिर्मितीचा पालिका निवडणुकीवर कसा परिणाम होईल?
उमेदवारांचे गटगठन, जनाधाराची दिशा आणि पक्षांतर्गत समीकरणे बदलण्याची शक्यता वाढेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com