Latur ZP election news : लातूर महापालिकेतील विजयानंतर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांची गाडी सुसाट सुटली आहे. जिल्हा परिषदेसाठी आघाडी करत मैदानात उतरलेल्या काँग्रेसने जिल्ह्यातील भाजप नेत्यांना लक्ष केले आहे. औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या मतदारसंघात अमित देशमुख यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ज्या शेत रस्त्यांसाठी पवारांचा औसा पॅटर्न राज्यात ओळखला जातो, त्या पॅटर्नचीच खिल्ली अमित देशमुख यांनी जाहीर सभेतून उडवली.
गाव रस्ते तसेच ठेवले अन् शेतरस्ते केले तेही वाहून गेले, कुठयं औसा पॅटर्न, कुठ़ जातोय निधी? असा सवाल करत औसा विधानसभा मतदार संघाची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी अमित देशमुख यांनी केली. कापूस, सोयाबीनला भाव द्या म्हणून दिंडी काढणारे आता बांबु लावत बसलेत, असा टोलाही त्यांनी लगावला. जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये टक्केवारीचे दरपत्रक ठरलेले आहे, वजन ठेवल्या शिवाय कागद हालत नाही, असा आरोप करत देशमुख अक्षरश: सताधाऱ्यांवर तुटून पडले.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला आता धार चढू लागली आहे. काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास लातूर महापालिकेतील यशानंतर कमालीचा वाढला आहे. यातूनच काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे. निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथील सभेत त्यांनी भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार यांना टारगेट केले.
विहीर, घरकुल, शेततळे, जनावराचे गोठे पैसे दिल्या शिवाय होत नाहीत. सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळला आहे, तुम्हाला भक्षक हवेत की सेवक? लातूरमधून महाराष्ट्रातील सत्तेच्या परिवर्तनाला सुरवात झाली आहे. लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कारभारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोपावलेला आहे. शेत रस्त्याचा असा पॅटर्न म्हणणारे रस्ते एका पावसात गेले कुठे? कुठं गेला सरकारी निधी?
शेत रस्ते केले गाव रस्ते ठेवले गाडीतून येताना उंटावरून फिरल्या सारखे गचके बसत होते. त्यामुळे औसा विधानसभा मतदारसंघाची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी अमित देशमुख यांनी केली. कापूस, सोयाबीनला भाव द्या म्हणून दिंडी काढणारे आता बांबू लावत बसलेत. पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचाराचे दर पत्रक ठरलेले आहेत, असा आरोप अमित देशमुख यांनी केला.
दहा वर्षापासून लातूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला असून वजन ठेवल्याशिवाय कागद हलत नाही. निलंग्याच्या पंचायत समितीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. हे बदलण्याची वेळ आता आली आहे. लातूर जिल्ह्यातूनच महाराष्ट्रात परिवर्तन होईल, असा विश्वास व्यक्त करतनाच या भागाचा विकास दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर यांनी केला. त्यांनी घालून दिलेला आदर्श, शिकवण भविष्यात पुढे न्यायची आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.