Latur ZP Election: लातूर जिल्हा परिषदेची सत्ता राखण्याचे भाजपसमोर आव्हान! काँग्रेसही लावणार जोर

BJP vs Congress Latur : महापालिकेनंतर लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे बिगूल वाजले असून सत्ता राखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे, तर प्रशासक राजानंतर काँग्रेस जोरदार कमबॅकसाठी सज्ज झाली आहे.
Political leaders and party workers intensify preparations as the Latur Zilla Parishad election approaches, with BJP defending power and Congress aiming for a comeback.
Political leaders and party workers intensify preparations as the Latur Zilla Parishad election approaches, with BJP defending power and Congress aiming for a comeback.Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच निवडणुक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगूल वाजवला. त्यामुळे महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होत नाही तोच जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला राजकीय पक्षांना लागावे लागेल. लातूर महापालिका निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे पक्षाला झटका बसला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादातून पक्षाला कसेबसे बाहेर आणले. महापालिका निवडणुकीचा निकाल काय लागेल? हे 16 तारखेला स्पष्ट होणार आहेच. परंतू आता जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे. 2022 पासून प्रशासक राज असलेल्या जिल्हा परिषदेत कमबॅक करण्यासाठी काँग्रेस पक्षही जोर लावणार आहे. त्यामुळे मिनी मंत्रालयाची निवडणूक रंगतदार होणार आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या 59 गट आणि दहा पंचायत समितीच्या 118 गणासाठी आता निवडणूक होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या 59 गटासाठी दोन महिन्यांपूर्वी आरक्षण निघाले होते. त्यामुळे निवडणूक लवकर जाहीर होईल, असे सर्वांनाच वाटत होते. आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय गणिते मांडण्यास सुरवात झाली होती. आरक्षणानंतर काहींचा भ्रमनिरास झाला तर काहींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्ते कामालाही लागले होते.

पक्षश्रेष्ठींकडे आपल्यालाच कशी उमेदवारी मिळेल, याकरिता फिल्डिंगही लावण्याची तयारी सुरू होती. पण नंतर राज्यातील काही जिल्हा परिषदांच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला. पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्याव्यात, असे आदेश दिले होते. पण आरक्षणाचा घोळ मात्र कायम होता. यात ही निवडणूक लांबणीवर पडली होती.

Political leaders and party workers intensify preparations as the Latur Zilla Parishad election approaches, with BJP defending power and Congress aiming for a comeback.
Latur ZP Reservation News : लातूर जिल्हा परिषदेतील एन्ट्रीसाठी इच्छूक कामाला, आरक्षणामुळे संधी हुकलेले पर्यायांच्या शोधात!

पण राजकीय पक्ष मात्र गेल्या काही दिवसांपासून तयारीला लागले होते. इच्छुकांचे अर्जदेखील मागविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यात सर्वोच्च न्यायालयाने 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घ्याव्यात, असे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आरक्षणाचा घोळ नसलेल्या बारा जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

त्यात लातूर जिल्हा परिषदेचा समावेश आहे. त्यामुळे आता 59 गट व दहा पंचायत समितींच्या 118 गणांसाठी ही निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेची यापूर्वी 2017 मध्ये निवडणूक झाली होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता जिल्हा परिषदेवर होती. गेल्या मार्च 2022 पासून जिल्हा परिषदेवर प्रशासकराज आहे.

Political leaders and party workers intensify preparations as the Latur Zilla Parishad election approaches, with BJP defending power and Congress aiming for a comeback.
Latur municipal elections : आमचेही ट्रिपल इंजिन! लातुरातील भर सभेत असे का म्हणाले अमित देशमुख ?

2017 मधील पक्षनिहाय संख्याबळ

  • भारतीय जनता पक्ष-36

  • काँग्रेस- 15

  • राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) -6

  • अपक्ष- 1

  • एकूण - 58

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com